Type Here to Get Search Results !

१५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचा उत्सव – लाईव्ह नवं विचार न्यूजच्या मुख्य संपादक सौ. सुनीता राजेंद्र महाडिक यांच्या हस्ते ध्वजारोहण

 
























मुख्य संपादक:- सौ सुनीता राजेंद्र महाडिक 
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा:- 9273165283




चाळीसगाव :
भारताचा स्वातंत्र्य दिन हा प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा व गौरवाचा दिवस. या दिनाचे औचित्य साधून चाळीसगाव येथील श्री शिव समर्थ कोचिंग क्लासेस मध्ये ध्वजारोहणाचा भव्य कार्यक्रम संपन्न झाला. या सोहळ्यासाठी लाईव्ह नवं विचार न्यूजच्या मुख्य संपादक सौ. सुनीता राजेंद्र महाडिक व त्यांचे पती श्री. राजेंद्र खंडू महाडिक यांना प्रमुख अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला सौ. सुनीता राजेंद्र महाडिक यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यावेळी विद्यार्थ्यांनी जल्लोषात टाळ्यांचा कडकडाट करत फटाक्यांच्या रोषणाईत स्वागत केले.

यानंतर प्रमुख अतिथींनी विद्यार्थ्यांना २०० वह्या, २०० पेन आणि अल्पोहार वाटप केला. विद्यार्थ्यांनी सादर केलेले डान्स, कविता व भाषणे यांचा आनंद सौ. सुनीता राजेंद्र महाडिक व श्री. राजेंद्र महाडिक यांनी मनापासून घेतला.

श्री शिव समर्थ कोचिंग क्लासेसचे संचालक श्री. रमेश रघुनाथ कोर यांनी श्री राजेंद्र खंडू महाडिक व सौ. सुनिता राजेंद्र महाडिक यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला. त्यांनी शब्दसुमनांनी गौरव करताना म्हटले –
"सौ. सुनीता राजेंद्र महाडिक या एकाच वेळी दैनिक अहिल्याराज पत्रकार, लाईव्ह नवं विचार न्यूज मुख्य संपादक, आयडियल पत्रकार संघ ठाणे जिल्हा अध्यक्ष, भाजपा महिला मोर्चा सदस्य, महाराष्ट्र राज्य महिला आयोग सदस्य, ठाणे जिल्हा पत्रकार संघ सदस्य ही विविध पदे यशस्वीपणे सांभाळत आहेत, ही खरंच चाळीसगावसाठी व आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे. त्यांना सदैव साथ लाभली आहे त्यांच्या पती श्री. राजेंद्र खंडू महाडिक यांची, हेही विशेष गौरवाचे आहे."

या प्रसंगी मार्गदर्शन करताना सौ. सुनीता राजेंद्र महाडिक म्हणाल्या –
"विद्यार्थी हेच भारताचे खरे सामर्थ्य व उज्ज्वल भविष्य आहेत. मेहनत, शिस्त आणि सकारात्मक विचार हीच यशाची गुरुकिल्ली आहे. याच मार्गावर चालून तुम्ही मोठे शिखर गाठू शकता."

🪷 सौ. सुनीता राजेंद्र महाडिक यांची समाजकार्य व पत्रकारितेतील तळमळ, साधी व नम्र कार्यपद्धती आणि विद्यार्थ्यांप्रती असलेली आपुलकी यामुळेच त्यांचा सन्मान हा प्रत्येकासाठी प्रेरणादायी क्षण ठरला. 🪷

Post a Comment

0 Comments