मुख्य संपादक: - सौ सुनिता राजेंद्र महाडिक
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा: - 9273165283
चाळीसगाव :
स्वातंत्र्य अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी व भाजप युवा मोर्चा चाळीसगाव शहर, वाघळी, मेढुंबारे, सायगाव मंडळ यांच्या वतीने भव्य "तिरंगा यात्रा – ऑपरेशन सिंदूर" चे आयोजन करण्यात आले होते. बुधवार दि. १३ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता या यात्रेला प्रारंभ झाला.
या तिरंगा यात्रेत शेकडो देशभक्त नागरिकांनी उत्साहाने सहभाग घेतला. हातात तिरंगा, घोषणाबाजी, देशभक्तीपर गीते यामुळे संपूर्ण वातावरण देशप्रेमाच्या जयघोषाने दुमदुमून गेले.
➡️ मार्ग:
यात्रेला छत्रपती शिवाजी महाराज चौक मैदान येथून सुरुवात झाली. स्वातंत्र्यवीर सावरकर चौक, अंशशाळा, बसस्टॅन्ड मार्गे पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज चौक मैदान येथे समारोप झाला.
➡️ वैशिष्ट्ये:
लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनी तिरंगा हातात धरून रॅलीत सहभाग नोंदवला.
घोषणाबाजीने “भारत माता की जय” आणि “वंदे मातरम्” चा गजर घुमला.
भाजपा महिला मोर्चा चाळीसगावच्या महिला सदस्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विशेष सहभाग नोंदवला.
🪷विशेषतः प्रतिभाताई चव्हाण
🪷देवयानी ठाकरे ताई
🪷पुष्पांजली पवार ताई
🪷सुलभा पवार ताई
🪷रिजवान खान ताई
🪷सुनिता राजेंद्र महाडिक ताई
🪷देवयानी महाजन ताई
🪷मोनिका गांगुर्डे ताई
आणि इतर सर्व महिला मोर्चाच्या पदाधिकारी तसेच भगिनी मंडळातील सर्व बहिणींच्या जिद्दीने, मेहनतीने व एकतेने हा उपक्रम अधिक भव्य आणि यशस्वी झाला.
या उपक्रमाला प्रेरणा देणारे व नेहमीच कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभे राहणारे व माझे मोठे भाऊ श्री मंगेश दादा चव्हाण यांचे विशेष कौतुक करण्यात आले. दादांचे कार्यकर्त्यांवरील ममत्व, त्यांची संघटन क्षमता, आणि समाजासाठी सतत झटणारी कार्यशैली यामुळेच आज चाळीसगावात भाजपची तिरंगा यात्रा इतक्या भव्य स्वरूपात पार पडली. ‘फक्त बोलून नव्हे तर करून दाखवणारे नेते’ अशी त्यांची ओळख असून त्यांच्या मार्गदर्शनामुळेच कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह आणि ऊर्जा निर्माण झाली.
तसेच भाजपा मंडळ अध्यक्ष नितीन पाटील यांच्या संघटन कौशल्यामुळे रॅली शिस्तबद्ध पार पडली.
रॅलीनंतर छत्रपती शिवाजी महाराज चौक मैदानावर देशभक्तीपर कार्यक्रम घेण्यात आला.
या भव्य तिरंगा यात्रेमुळे चाळीसगाव शहरात देशभक्तीचे वातावरण निर्माण झाले. आयोजकांनी सर्व नागरिक आणि विशेषतः महिला मोर्चाच्या भगिनींच्या सहभागाबद्दल मन:पूर्वक आभार मानले.





Post a Comment
0 Comments