Type Here to Get Search Results !

टाकळी येथे शिवस्मृती प्रतिष्ठाणतर्फे श्री स्वामी समर्थ केंद्र (श्रीक्षेत्र दिंडोरी) दर्शन यात्रा

 

मुख्य संपादक: - सौ सुनीता राजेंद्र महाडिक 

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा:-9273165283



टाकळी (ता. चाळीसगाव) – शिवस्मृती प्रतिष्ठाण अंतर्गत श्री स्वामी समर्थ केंद्र (श्रीक्षेत्र दिंडोरी) येथे दर्शन यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. ही पवित्र यात्रा दिनांक १४ ऑगस्ट २०२५ रोजी, गुरुवार, सकाळी ६:०० वाजता टाकळी येथून प्रस्थान करणार आहे.


या यात्रेचे आयोजन अश्वमेध पब्लिक स्कूल टाकळी प्र.दे. चे अध्यक्ष श्री. अण्णा पवार आणि टाकळी ग्रामपंचायतीच्या माननीय सरपंच सौ. पुष्पांजली पवार यांच्या पुढाकाराने करण्यात आले आहे. सौ. पुष्पांजली पवार या आपल्या कार्यकुशल, मनमिळाऊ व सर्वसमावेशक स्वभावासाठी ओळखल्या जातात. ग्रामविकास आणि सामाजिक उपक्रमांत त्यांचा नेहमीच पुढाकार असतो. भक्तिमय कार्यक्रमांना नेहमी प्रोत्साहन देत त्या ग्रामस्थांना एकत्र आणण्याचे काम करतात.


भक्तिमय वातावरणात आणि भाविकांच्या उत्स्फूर्त सहभागातून ही यात्रा पार पडणार असून, सर्वांनी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments