Type Here to Get Search Results !

लायन्स क्लब कराडचा सायबर गुन्हे जनजागृती उपक्रम; पोलीस उपमहानिरीक्षकांसोबत सामाजिक परिवर्तनासाठी अर्थपूर्ण चर्चा

 

मुख्य संपादक:-सौ सुनिता राजेंद्र महाडिक 

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा:-9273165283



कराड प्रतिनिधी:- विद्या मोरे

लायन्स क्लब कराडच्या वतीने "सायबर गुन्हे आणि समाजाने कसे चौकस राहावे" या विषयावर जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते पोलीस उपमहानिरीक्षक (सायबर क्राईम) श्री. शिंत्रे यांनी सायबर गुन्ह्यांचे वाढते प्रमाण, त्यामागील युक्त्या आणि नागरिकांनी घ्यावयाची काळजी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.


कार्यक्रमानंतर लायन जगदीश पुरोहित यांनी श्री. शिंत्रे यांच्यासोबत सविस्तर चर्चा करून, लायन्स संघटना आणि सरकारी यंत्रणा यांच्या सहकार्यातून विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्याची संकल्पना मांडली. यात शिक्षणवृद्धी, आरोग्यसेवा, पर्यावरण संरक्षण, गरजू व वंचित घटकांना मदत, लहान मुलांमधील कर्करोग उपचार तसेच भूकबळी रोखण्यासाठी उपक्रम अशा विषयांचा समावेश होता.


श्री. शिंत्रे यांनी या संकल्पनेला सकारात्मक प्रतिसाद देत, गांभीर्याने विचार व पुढील कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. या चर्चेमुळे लायन्स संघटनेसाठी सरकारी सहकार्याची नवी दारे उघडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.


हा संवाद केवळ सायबर गुन्ह्यांबाबत जागरूकतेपुरता मर्यादित न राहता, सामाजिक परिवर्तनासाठी ठोस कृती आराखडा तयार करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल ठरला.

Post a Comment

0 Comments