मुख्य संपादक: - सौ सुनीता राजेंद्र महाडिक
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा: जी9273165283
अंबरनाथ – शहरातील गटार, रस्ते आणि रस्त्यावरील दिवे या मूलभूत सुविधांबाबत नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाने त्याकडे कानाडोळा केल्यामुळे आज अंबरनाथमध्ये जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले. होते
अंबरनाथ नगरपरिषद प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात काढण्यात आलेला हा मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज चौकातून निघून नगरपरिषद कार्यालयावर धडकला. नागरिकांनी “आमच्या समस्या सोडवा”, “भ्रष्टाचार बंद करा” अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
मोर्चामध्ये सहभागी नागरिकांनी सांगितले की, शहरातील अनेक रस्त्यांची अवस्था अतिशय बिकट असून, पावसाळ्यात चिखल व खड्ड्यांमुळे वाहतूक ठप्प होते. अनेक भागात गटारांची स्वच्छता होत नसल्याने सांडपाणी रस्त्यावर येते, तर रस्त्यावरील दिवे बंद असल्याने रात्रीच्या वेळी अपघातांची शक्यता वाढली आहे.
या मोर्चाचे नेतृत्व भारतीय जनता पार्टी (अंबरनाथ शहर) तर्फे अध्यक्ष विश्वजीत गुलाबराव करंजुळे पाटील आणि शक्ती केंद्र प्रमुख सौ. स्वप्नाली शिंदे यांच्या प्रभावी मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
नागरिकांनी सांगितले की, “विश्वजीत पाटील हे नेहमीच अंबरनाथच्या विकासासाठी लढणारे, आवाज बुलंद करणारे नेते आहेत. त्यांची लोकांशी असलेली जवळीक आणि कामातली पारदर्शकता आम्हाला विश्वास देते.”
तर स्वप्नाली ताई शिंदे यांचेही विशेष कौतुक करण्यात आले. महिलांपासून ते तरुणांपर्यंत सर्वच घटकांमध्ये त्यांचा दांडगा संपर्क असून, लोकांच्या समस्यांसाठी ताई रात्रंदिवस धावून जातात, असे नागरिकांनी गौरवोद्गार काढले.
आयोजकांनी प्रशासनाला इशारा दिला की, लवकरात लवकर समस्या सोडवण्यात आल्या नाहीत तर यापेक्षा तीव्र आंदोलन करण्यात येईल.
अंबरनाथकरांचा आक्रोश ऐकणार कोण? हा प्रश्न या मोर्चानंतर पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे.

Post a Comment
0 Comments