बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा: - 9273165283
चाळीसगाव – शहरातील कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी नुकतीच नियुक्ती झालेल्या नव्या पोलीस निरीक्षक अमित कुमार मनेळ यांचा लाईव्ह नव विचार न्यूज च्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात मुख्य संपादक सौ. सुनीता राजेंद्र महाडिक यांनी पुष्पगुच्छ, सन्मानचिन्ह व अभिनंदनपर शब्दांनी मनेळ यांचा गौरव केला.
अमित कुमार मनेळ हे कर्तव्यदक्ष, प्रामाणिक व जनसामान्यांच्या सुरक्षेसाठी सदैव तत्पर राहणारे अधिकारी म्हणून ओळखले जातात. त्यांनी पूर्वीच्या सेवेत गुन्हेगारीवर प्रभावी अंकुश ठेवून, नागरिकांशी सुसंवाद वाढवण्यावर भर दिला आहे. चाळीसगावच्या विकासात आणि सुरक्षिततेत आपला मोलाचा वाटा उचलण्याची त्यांची तयारी कार्यक्रमात स्पष्ट जाणवली.
सौ. सुनीता महाडिक यांनी यावेळी बोलताना सांगितले की, “शहराच्या सुरक्षेसाठी कणखर नेतृत्वाची गरज असते, आणि मनेळ सरांची नियुक्ती हे चाळीसगावकरांसाठी भाग्याचे पाऊल आहे. त्यांची कार्यशैली आणि जनतेशी असलेली जवळीक निश्चितच प्रेरणादायी ठरेल.”
हा सत्कार उत्साहपूर्ण आणि आपुलकीच्या वातावरणात पार पडला.

Post a Comment
0 Comments