मुख्य संपादक:- सौ सुनिता राजेंद्र महाडिक
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा:- 9273165283
सहदुय्यम निबंधकांची माहिती – नागरिकांसाठी मोठा दिलासा
सहदुय्यम निबंधक कार्यालय व इतर सर्व प्रकारच्या प्रमाणपत्रांसाठी शासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता कोणत्याही कागदपत्रासाठी मुद्रांक शुल्क भरण्याची आवश्यकता नाही.
सहदुय्यम निबंधक यांची माहिती:
नागरिक, बोर्ड विक्रेते, सेवा केंद्रांना सूचित करण्यात आले आहे की जन्म प्रमाणपत्र, मृत्यू प्रमाणपत्र, जातीचा दाखला, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, वास्तव्य प्रमाणपत्र, विवाह नोंदणी, राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र अशा सर्व प्रकारच्या प्रमाणपत्रांसाठी मुद्रांक शुल्क माफ करण्यात आले आहे.
न्यायालयात प्रतिज्ञापत्र किंवा शपथपत्र दाखल करताना देखील मुद्रांक शुल्क लागणार नाही. केवळ साध्या कागदावर स्वप्रतिज्ञापत्र (Affidavit) घेणे पुरेसे आहे. शासनाने स्पष्ट केले आहे की, शासकीय सेवांसाठी आवश्यक असलेल्या दस्तऐवजांवरील मुद्रांक शुल्क आकारणी कायमची रद्द केली आहे.
पूर्वी नागरिकांना विविध प्रमाणपत्रांसाठी न्यायालयीन प्रतिज्ञापत्रासोबत मुद्रांक शुल्क द्यावे लागत होते. यामध्ये जातीचे प्रमाणपत्र, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, वास्तव्याचे प्रमाणपत्र, राष्ट्रीयत्वाचे प्रमाणपत्र, विवाह नोंदणी इत्यादींचा समावेश आहे. आता हे सर्व पूर्णपणे शुल्कमुक्त झाले आहे.
हा निर्णय शासनाच्या निर्देशानुसार तत्काळ लागू करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना वेळेची आणि पैशांची मोठी बचत होणार आहे.


Post a Comment
0 Comments