मुख्य संपादक:- सौ सुनिता राजेंद्र महाडिक
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा:- 9273165283
अंबरनाथ (पूर्व) – भारतीय जनता पार्टी अंबरनाथ शहर व गुलाबराव करंजुले प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने काल अंबरनाथ पूर्व येथे पारंपारिक मंगळागौरी खेळांचा भव्य सोहळा उत्साहात पार पडला. मराठमोळ्या संस्कृतीचे दर्शन घडवणारे हे खेळ महिलांसाठी केवळ मनोरंजन नव्हते, तर परंपरा, ऐक्यभाव आणि आनंदाचा संगम ठरले.
या कार्यक्रमाची संकल्पना श्री. राजेंद्र अप्पा कुलकर्णी (सरचिटणीस, अंबरनाथ पूर्व) यांनी मांडली होती. कार्यक्रमासाठी प्रमुख मान्यवर उपस्थित होते:
श्री. गुलाबराव करंजुले पाटील
(महाराष्ट्र भाजपा प्रदेश सचिव, अंबरनाथ भाजपाचे सर्वेसर्वा व प्रसिद्ध उद्योजक)
सौ. सुनीता गुलाबराव करंजुले पाटील
श्री. अभिजीत गुलाबराव करंजुले पाटील
(कल्याण जिल्हा सरचिटणीस)
श्री. विश्वजीत गुलाबराव करंजुले पाटील
(अध्यक्ष, अंबरनाथ पूर्व मंडळ)
सौ. वृंदा पटवर्धन
(सरचिटणीस, अंबरनाथ)
डॉ. रोझलिन फर्नांडिस
(विधानसभा महिला मोर्चा संयोजक)
सौ. कुसुम रोहिदास
(उपाध्यक्ष, अंबरनाथ)
सौ. स्वप्निल शिंदे
(शक्ती केंद्रप्रमुख, महालक्ष्मी नगर)
सौ. सुनिता राजेंद्र महाडिक
(भाजपा सोशल मीडिया प्रमुख व Live नव विचार News मुख्य संपादक)
या कार्यक्रमात महिलांनी उत्साहाने मंगळागौरीचे पारंपारिक खेळ खेळत मराठमोळ्या संस्कृतीचे वैभव जपले. पारंपारिक गाणी, खेळ आणि एकमेकींसोबतचे संवाद यामुळे सभागृहात एक आनंदमय वातावरण निर्माण झाले. या उपक्रमाने “आपली परंपरा ही आपली ताकद आहे” हा संदेश अधोरेखित केला.
श्री. गुलाबराव करंजुले पाटील यांचे विशेष कौतुक – त्यांनी या सांस्कृतिक परंपरांचे संवर्धन व्हावे यासाठी सातत्याने पुढाकार घेतला आहे. समाजोपयोगी व संस्कृतीप्रेमी कार्यात नेहमीच आघाडीवर असणाऱ्या गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनामुळे हा कार्यक्रम अधिक आकर्षक व यशस्वी झाला.
कार्यक्रमादरम्यान सामाजिक संदेश देण्यात आले: “प्लास्टिक टाळा, पाणी वाचवा, स्त्रीभ्रूणहत्या रोखा”, तसेच स्त्रीचे जीवन आणि तिची भूमिका किती महत्वाची आहे यावरही भर देण्यात आला.
हा उपक्रम फक्त खेळापुरता मर्यादित न राहता, समाजजागृती आणि संस्कृती संवर्धनाचा सुंदर संगम ठरला. उपस्थित नागरिकांनी या उपक्रमाचे भरभरून कौतुक केले.





Post a Comment
0 Comments