Type Here to Get Search Results !

चाळीसगावचे लाडके आमदार आणि माझे मोठे भाऊ श्री. मंगेश दादा चव्हाण यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

 

मुख्य संपादक:- सौ सुनिता राजेंद्र महाडिक 


मंगेश दादा हे नाव ऐकलं की डोळ्यासमोर येतो एक खंबीर, प्रामाणिक आणि लोकांच्या मनावर राज्य करणारा नेता! ऊन असो, वारा असो, पाऊस असो – दादा नेहमी लोकांच्या सेवेत तत्पर असतात. रात्री-अपरात्री, कोणतीही वेळ असो, चाळीसगावच्या जनतेची हाक लागली की दादा तात्काळ धावून जातात.


त्यांची कार्यपद्धती वेगळी आहे – दिखावा नाही, वचनबद्धता नाही; तर थेट कृती! प्रत्येक समस्या ते स्वतःची समजून सोडवतात. गावोगाव रस्ते असो, पाणी असो, शिक्षण असो किंवा रोजगार, दादांनी चाळीसगाव तालुक्याचा चेहरामोहरा बदलण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतली आहे.

त्यांची ओळख केवळ आमदार म्हणून नाही - तर एका जननायकाच्या रूपात आहे.


दादांची कार्यपद्धती म्हणजे फक्त एकच गोष्ट - "शब्द कमी, कृती जास्त!"


समस्या काहीही असो रस्ते, पाणी, वीज, शिक्षण, रोजगार किंवा सामाजिक प्रश्न दादांची पहिली प्राधान्यक्रम नेहमी जनता असते.


दादांचं नेतृत्व का वेगळं आहे?


प्रत्येक नागरिकाशी आपुलकीने वागणारा नेता


संकटात पहिला धावून जाणारा आधार


विकासकामात पारदर्शकता आणि वेग


तालुक्याच्या प्रत्येक सण-उत्सवात सहभाग


मंगेश दादा हे खंबीर नेतृत्वाचं दुसरं नाव आहे !


त्यांच्या कार्यामुळे आज चाळीसगाव तालुका केवळ ओळखला जात नाही, तर महाराष्ट्रात आदर्श ठरत आहे. दादांचा स्वभाव म्हणजे - मृदूभाषी, पण कामात धडाडी; जमिनीवरचे राहून जनतेच्या हृदयात घर करणारा नेता.

सण-उत्सवांच्या बाबतीत दादांची धडाडी वेगळीच! गणेशोत्सव, शिवजयंती, दहीहंडी असो – प्रत्येक सण मोठ्या उत्साहाने, थाटामाटात साजरा करून लोकांना एकत्र आणणारे दादा हे फक्त नेता नाहीत तर तालुक्याचे खरे मानकरी आहेत.


या यशामागचं सर्वात मोठं बळ म्हणजे त्यांची जीवनसाथी व माझ्या वहिनी सौ. प्रतिभा मंगेश चव्हाण 


ताई म्हणजे सौंदर्य, संस्कार आणि समाजसेवा यांचं अद्वितीय मिश्रण !


दादांच्या खांद्याला खांदा लावून वाहिनी नेहमी उभ्या राहतात. महिलांसाठी, मुलींच्या शिक्षणासाठी आणि सामाजिक उपक्रमांसाठी ताईंचं योगदान अनमोल आहे.


वहिनींच्या मनातला आपुलकीचा ओलावा आणि हसतमुख स्वभाव यामुळे त्या चाळीसगावच्या महिला वर्गासाठी प्रेरणास्थान आहेत.


दादा-वहिनी हे जोडीने चाळीसगावचं नाव उज्ज्वल करत आहेत आणि खऱ्या अर्थाने लोकसेवेचं आदर्श उदाहरण घालून देत आहेत.


मला गर्व आहे की माझा मोठा भाऊ आणि वहिनी असे आहेत.


दादा, तुमचं आणि वहिनी च नातं चाळीसगावसाठी प्रेरणादायी आहे.


वाढदिवसाच्या कोट्यवधी शुभेच्छा दादा ! दीर्घायुषी व्हा आणि असंच महाराष्ट्रभर गाजत राहा!

Post a Comment

0 Comments