Type Here to Get Search Results !

“ज्ञान, ऐक्य आणि संस्कृतीचा उत्सव – बुरहानपूरात मराठा समाजाचा भव्य सोहळा”

 


मुख्य संपादक:- सौ सुनिता राजेंद्र महाडिक 

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा:- 9273165283



🌸🌷 हार्दिक शुभेच्छा व अभिनंदन 🌷🌸


 दिनांक 24/08/2025 रोजी श्री दक्षिणी मराठा समाज विकास समिती, बुरहानपूर (म.प्र.) यांच्या वतीने आयोजित सत्कार समारंभ, विद्यार्थी गुणगौरव सोहळा व स्नेहमिलन समारोह अत्यंत मंगलमय, उत्साहवर्धक व दिमाखदार वातावरणात यशस्वीपणे पार पडला.


हा कार्यक्रम खरोखरच मस्त, सुंदर आणि प्रेरणादायी ठरला. संपूर्ण समाजासाठी एक आदर्शवत उपक्रम म्हणून हा सोहळा लक्षात राहील. विद्यार्थ्यांना गौरवून त्यांचा सन्मान करणे ही अतिशय मोलाची परंपरा मंडळाने पुढे नेली आहे. कार्यक्रमात समाजातील बंधु-भगिनींची एकत्रित उपस्थिती पाहून समाजातील ऐक्य आणि स्नेह दृढ झाल्याचे जाणवले.


✅ भोजन उत्कृष्ट, रुचकर व स्वादिष्ट होते.

✅ संपूर्ण आयोजन सुरेख, शिस्तबद्ध व आकर्षक होते.

✅ सर्व पाहुण्यांचे मनःपूर्वक स्वागत आणि आदरातिथ्य करण्यात आले.

✅ विद्यार्थिनी व महिलांची लक्षणीय उपस्थिती प्रेरणादायी होती.

✅ सूत्रसंचालन सुंदर, प्रभावी व आकर्षक पद्धतीने झाले.


या भव्य समारंभाला आपल्या समाजाचे गौरव व एकमेव खासदार मा. दादासाहेब श्री. ज्ञानेश्वर नथ्थुजी गुजांळ तसेच अनेक मान्यवरांनी हजेरी लावून कार्यक्रमाची शोभा वाढवली. उपस्थित मान्यवरांची यादी पुढीलप्रमाणे –


मा. दादासाहेब श्री. ज्ञानेश्वर नथ्थुजी गुजांळ (खासदार), आण्णासाहेब अर्जुनराव गायके, आबासाहेब भिकनराव शेळके, आण्णासाहेब आनंदराव चौथे, श्री. मनोजभाऊ पवार, श्री संजयभाऊ कापसे, दादासाहेब विठ्ठलराव गुजांळ, श्री. श्रीकृष्ण देवकर, श्री. प्रभाकर पडोळ, श्री. चितांमन मते, श्री. राजेंद्रभाऊ जगताप, श्री. शकंरराव जाधव, श्री. सजंयभाऊ जाधव, श्री. बाळासाहेब मते, श्री. धर्मराज पाचोरे, श्री. वसंतराव गवंदे, श्री. अशोक भोईटे, श्री. पंडितराव ईगंळे, श्री. नवनित शिंदे, श्री. साहेबराव थोरात सर, श्री. सजंय एरंडे, श्री. सुनिल शिंदे, श्री. धर्मराज पवार, श्री. शालिग्राम मते, श्री. विष्णुआप्पा बाळदे, श्री. कैलासराव मराठे, श्री. सोपान देवकर, श्री. विनायक मांडोळे, श्री. संभाजीदादा चव्हाण, श्री. साहेबराव वराडे, श्री. संभाजी काळे, श्री. राजेंद्र शिंदे, श्री. प्रकाश तांदळे, श्री. कैलास वायकर, श्री. गोकुळ सुर्यवंशी, डॉ. वाल्मिक पिजंन, श्री. कैलास शिंदे, श्री. सदाशिव चव्हाण तसेच अनेक समाज बांधवांनी हजेरी लावून कार्यक्रम यशस्वी केला.


हा उपक्रम खरोखरच समाजासाठी प्रेरणादायी ठरला आहे. विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळाले आणि समाजात ऐक्याचा संदेश गेला, ही या सोहळ्याची मोठी जमेची बाजू आहे.


मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव व संपूर्ण कार्यकारिणी यांचे मनःपूर्वक आभार, अभिनंदन व धन्यवाद!

आपल्या हातून असेच समाजविकासाचे पवित्र कार्य पुढेही घडत राहो, हीच सदिच्छा!


मंडळाच्या भावी वाटचालीस आजच्या या मंगलदिनी लाख लाख मंगलमय शुभेच्छा व अभिष्टचिंतन!


🌸🌼💐🌹🌻

Post a Comment

0 Comments