Type Here to Get Search Results !

*चाळीसगावात छत्रपती शिवरायांचे शूरवीर अंगरक्षक जिवाजी महाले यांचे भव्य स्मारक उभारावे -राष्ट्रीय जन मंच पक्ष आणि सकल नाभिक समाजाच्या वतीने मागणी*

 


मुख्य संपादक:- सौ सुनिता राजेंद्र महाडिक 

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा:- 9273165283



“होता जिवा म्हणून वाचला शिवा” हे अजरामर ब्रीदवाक्य शूरवीर जिवाजी महाले यांच्या अद्वितीय शौर्यामुळे उदयाला आले. अफझलखान वध प्रकरणात महाराजांवर झालेल्या हल्ल्यात त्यांनी अंगावर घेतलेली तलवारीचे घाव आणि त्यातून वाचवलेले स्वराज्यनायक याची गाथा आजही महाराष्ट्राच्या स्मृतीपटलावर कोरलेली आहे.


शहरात ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी आणि भावी पिढ्यांना प्रेरणा देण्यासाठी शूरवीर जिवाजी महाले यांचे भव्य स्मारक उभारले गेले, तर ते स्वराज्य निष्ठा, शौर्य व बलिदानाचे प्रतीक ठरेल,


 “छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास प्रत्येकाच्या घराघरात पोहोचवायचा असेल, तर त्यांचे पराक्रमी शिलेदार, अंगरक्षक व गनिमी काव्याचे शिल्पकार अशा योद्ध्यांचे स्मरण कायम ठेवणे गरजेचे आहे. चाळीसगाव शहर हे व्यापारीदृष्ट्या तसेच ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वाचे असून, येथे शूरवीर जिवाजी महाले यांचे भव्य स्मारक उभारणे ही काळाची गरज आहे.” 

स्थानिक नागरिक व युवकांनीही या मागणीला पाठिंबा दर्शविला असून, लवकरात लवकर भव्य स्मारक उभारण्याची ठोस पावले प्रशासनाने उचलावीत, अशी अपेक्षा जनतेमधून व्यक्त होत आहे. मागणीचे निवेदन तहसीलदार आणि मुख्याधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.

                           

        छत्रपती शिवाजी महाराजांचे निष्ठावंत शूरवीर अंगरक्षक जिवाजी महाले यांच्या स्मृती जागविण्यासाठी शहरात त्यांचे भव्य स्मारक उभारावे. अन्यथा राष्ट्रीय जन मंच पक्षातर्फे तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल. व होणाऱ्या परिणामास प्रशासन जबाबदार राहील याची नोंद घ्यावी.


                            

निवेदनावर संदीप लांडगे प्रदेश सचिव , सुरेश वेळीस - तालुका अध्यक्ष 

राष्ट्रीय जन मंच पक्ष, 

 शिवाजी बहाळकर (नाभिक समाज चाळीसगाव तालुका अध्यक्ष ), गणेश सोनवणे (उपाध्यक्ष नाभिक समाज, चाळीसगाव तालुका), पिंटू वाघ, चंद्रशेखर बोरसे (बंटी दादा), तुषार वेलीस, बी टी नाडार, दाऊद शेख, मास्टर जमील शेख,                                         

तमिझ बेग, मोहसीन शेख आदी उपस्थित होते.


निवेदनाची प्रत - मा. आमदार, चाळीसगाव विधानसभा, मा. खासदार -जळगाव लोकसभा, मा. जिल्हाधिकारी- जळगाव,

मा. पालकमंत्री- जळगाव,

मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांना पाठवण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments