मुख्य संपादक :- सौ सुनिता राजेंद्र महाडिक
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा:- 9273165283
रांजणगाव (ता. चाळीसगाव, जि. जळगाव) येथे दिनांक 26 ऑगस्ट 2025 रोजी लोकशाहीर डॉ. अन्नाभाऊ साठे यांच्या 105 व्या जयंतीनिमित्त भव्य सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन 2627 फाऊंडेशन तसेच सुमित नवगिरे, ज्ञानेश्वर कांबळे आणि मनोज नवगिरे यांच्या पुढाकाराने करण्यात आले.
लोकशाहीर डॉ. अन्नाभाऊ साठे हे सामाजिक न्याय, समता आणि साहित्य क्षेत्रातील एक अद्वितीय व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या लेखनातून दलित, वंचित आणि शोषित घटकांचे वास्तव समोर आले. ‘फकिरा’ सारख्या साहित्यकृतींमधून त्यांनी क्रांतिकारी विचार रुजवले. त्यांच्या गाथा, पोवाड्यांमधून अन्यायाविरोधातील लढ्याची ज्योत पेटवली. त्यामुळे त्यांना ‘लोकशाहीर’ ही उपाधी बहाल करण्यात आली.
कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी म्हणून आमदार माननीय श्री. मंगेश दादा चव्हाण उपस्थित होते. त्यांच्या हस्ते अन्नाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तसेच संपूर्ण समाजाच्या आणि 2627 फाऊंडेशनच्या वतीने मंगेश दादांचा सत्कार करून त्यांचा गौरव करण्यात आला.
मंगेश दादा चव्हाण हे सदैव जनतेच्या संपर्कात राहून विकासासाठी झटणारे लोकप्रतिनिधी आहेत. सामाजिक प्रश्नांवर नेहमीच तत्पर राहणारे, सर्व घटकांना न्याय मिळावा यासाठी कटीबद्ध असलेले नेतृत्व म्हणून त्यांनी विशेष ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या कार्यामुळे चाळीसगाव तालुक्यात विकासाची नवी दिशा मिळाली आहे. त्यामुळे त्यांचा सन्मान हा संपूर्ण समाजाचा सन्मान आहे.
या कार्यक्रमाला मान्यवरांची उपस्थिती लाभली. त्यात सतीश भाऊ पाटे (माजी पंचायत समिती सदस्य रांजणगाव), प्रभाकर भाऊ जाधव (जिल्हा परिषद सदस्य चाळीसगाव), संजय भाऊ कापसे (भाजपा सदस्य चाळीसगाव) यांनी हजेरी लावून कार्यक्रमाला विशेष भारदस्तपणा दिला.
सतीश भाऊ पाटे हे गावपातळीवर विकासकामात सदैव पुढाकार घेणारे नेतृत्व म्हणून ओळखले जातात. प्रभाकर भाऊ जाधव यांनी जिल्हा परिषदेमार्फत अनेक सामाजिक योजनांचा लाभ पोहोचवण्यासाठी केलेले प्रयत्न उल्लेखनीय आहेत. तर संजय भाऊ कापसे हे भारतीय जनता पक्षाचे सक्रीय सदस्य असून समाजकार्यासाठी नेहमीच तत्पर राहतात. त्यांची उपस्थिती ही कार्यक्रमासाठी प्रेरणादायी ठरली.
तसेच सुभाष पगारे (लहुजी शक्ती सेना उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष) यांचेही मनपूर्वक स्वागत करण्यात आले.
या सोहळ्यात गावातील सर्व मातंग समाजबांधवांसह अनेक कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून कार्यक्रम यशस्वी केला.

Post a Comment
0 Comments