मुख्य संपादक:- सुनिता राजेंद्र महाडिक
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा: -9273165283
अनुसूचित समाजाच्या न्यायासाठी लढणारे डॉ. धर्मपाल मेश्राम – पारदर्शकतेचे प्रतीक, बीएस एज्युकेशन संस्थेवर काटेकोर कारवाईचे आदेश
पुणे : महाराष्ट्र अनुसूचित जाती-जमाती आयोगाच्या वतीने पुण्यात झालेल्या भव्य जनसुनावणीत आयोगाचे उपाध्यक्ष डॉ. धर्मपाल मेश्राम यांनी पुन्हा एकदा आपल्या ठाम भूमिकेने समाजाच्या मनात विश्वास निर्माण केला. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले – “अन्याय सहन केला जाणार नाही, आणि पारदर्शकता हीच खरी ताकद आहे.”
बीएस एज्युकेशन संस्थेबाबत आलेल्या तक्रारींची सखोल आणि काटेकोर चौकशी करून वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्याचे आदेश डॉ. मेश्राम यांनी दिले. यामुळे जनतेच्या मनात आयोगाविषयी आदर अधिक वाढला आहे.
डॉ. धर्मपाल मेश्राम हे केवळ पदावर बसून आदेश देणारे नाहीत, तर खऱ्या अर्थाने समाजाच्या प्रत्येक प्रश्नासाठी लढणारे योद्धा आहेत. त्यांनी आपल्या कारकिर्दीत न्याय, समता आणि पारदर्शकता या तत्त्वांना कधीच तिलांजली दिली नाही. आजच्या बैठकीतही त्यांच्या प्रभावी नेतृत्वाची झलक दिसली.
या जनसुनावणीत शैक्षणिक संस्थांबरोबरच सरकारी कार्यालये, बँकिंग सेवा, रोजगार, विमा आणि शासकीय योजनांबाबत आलेल्या तक्रारींवरही सखोल चर्चा झाली. तक्रारदारांना हक्काची माहिती मिळाली आणि संबंधित विभागांना कठोर निर्देश देण्यात आले.
डॉ. मेश्राम हे नेहमीच पीडितांच्या बाजूने ठामपणे उभे राहतात. त्यांची जिद्द, पारदर्शकतेवरील विश्वास आणि न्यायासाठीची आक्रमकता हे समाजासाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्यासारखे नेतृत्व मिळणे ही समाजासाठी अभिमानाची बाब आहे.

Post a Comment
0 Comments