बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा:- 9273165283
चाळीसगाव तालुक्यातील खरजई नाका परिसरातील सुपुत्री ऋतुजा पवार हिने आपल्या अथक मेहनत, ध्येयधोरण आणि आत्मविश्वासाच्या जोरावर एमपीएससी मार्फत थेट तलाठी पद मिळवून अलिबाग येथे नियुक्ती मिळवली आहे.
आजच्या युगात मुली फक्त शिक्षण घेत नाहीत, तर समाजातील उच्च शिखर गाठत आहेत, याचा सर्वोत्तम आदर्श म्हणजे ऋतुजा पवार! ग्रामीण भागातून येऊन त्यांनी जे घवघवीत यश मिळवले आहे ते सर्वांसाठी अभिमानास्पद आहे. त्यांची ही वाटचाल सिद्ध करते की जर ध्येय मोठे असेल आणि जिद्द प्रखर असेल, तर कुठलाही अडथळा मोठा नसतो.
‘मुलगी शिकली तर घर, समाज आणि देश प्रगत होतो’ ही म्हण ऋतुजाने खऱ्या अर्थाने सार्थ ठरवली आहे. आज त्या केवळ चाळीसगावचाच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्याचा अभिमान ठरल्या आहेत. त्यांचे हे यश असंख्य मुलींना प्रेरणा देणारे आहे.
या अभिमानास्पद क्षणी शाहू मराठा मंडळातर्फे ऋतुजाचा भव्य सत्कार करण्यात आला. शाहू मराठा मंडळ नेहमीच अशा गुणवंत व्यक्तींचा सन्मान करून समाजात एक आदर्श निर्माण करत असते. त्यांच्या या उपक्रमामुळे होतकरू तरुणाईला प्रेरणा मिळते आणि समाजात सकारात्मकता निर्माण होते.
या कार्यक्रमाला मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. प्रमुख पाहुणे:
प्रा. रामकृष्ण पांगारे
लाईव्ह नवं विचार न्यूजच्या मुख्य संपादक सौ. सुनीता राजेंद्र महाडिक यांचे पती
श्री. राजेंद्र खंडू महाडिक
श्री. विनायक मंडोळे
श्री. संजय भाऊ कापसे
श्री. विलास बापू दुसिंग
श्री. संजय भाऊ दुसिंग
श्री. किशोर शिरसाठ
श्री. सुनिल कावरे
श्री. ललित बिडे
श्री रोहित जाधव
श्री. मधुभाऊ गुंजाळ
श्री. जगदीश चव्हाण
श्री. निलेश जाधव
श्री. विजय गायकवाड
कु. मुकेश सुनिता राजेंद्र महाडिक
सर्व मान्यवरांनी ऋतुजाच्या मेहनतीचे आणि यशाचे मनःपूर्वक कौतुक केले आणि ‘अशा मुलीमुळे समाजाला नवा आदर्श मिळतो’ असे गौरवोद्गार काढले.
शाहू मराठा मंडळाने ऋतुजाला हार्दिक शुभेच्छा देत, तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी सदिच्छा व्यक्त केल्या.

Post a Comment
0 Comments