बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा:- 9273165283
📰 पत्रकारांवरील हल्ल्याचा निषेध – गिरीश भाऊ महाजन व आमदार मंगेश दादा चव्हाण यांची संवेदनशील भूमिका
त्र्यंबकेश्वर येथे वृत्तांकनासाठी जात असताना पार्किंगवरून गुंड प्रवृत्तीच्या कर्मचाऱ्यांकडून नाशिकमधील इलेक्ट्रॉनिक माध्यमांचे प्रतिनिधी पत्रकार योगेश खरे, अभिजीत सोनवणे व किरण ताजणे यांना जबर मारहाण करण्यात आली.
या घटनेत गंभीर जखमी झालेल्या पत्रकार किरण ताजणे यांची नाशिकच्या अपोलो व सुयश रुग्णालयात भेट घेऊन तब्येतीची विचारपूस करण्यासाठी मा. मंत्री गिरीश भाऊ महाजन तसेच आमदार मंगेश दादा चव्हाण यांनी स्वतः उपस्थित राहून पत्रकार बांधवांना मोठा दिलासा दिला.
गोष्टीची माहिती कळताच आमदार मंगेश दादा चव्हाण यांनी त्वरित हॉस्पिटलमध्ये धाव घेऊन, “पत्रकार समाजाचे खरे प्रहरी आहेत. त्यांच्यावर अन्याय होणे म्हणजे लोकशाहीला गालबोट. दोषींवर कठोरात कठोर कारवाई व्हावी, यासाठी मी स्वतः प्रयत्नशील राहीन” अशी ठाम भूमिका घेतली. त्याचप्रमाणे त्यांनी पत्रकारांच्या पाठीशी सदैव उभे राहण्याचा आत्मविश्वास दिला.
तर मा. मंत्री गिरीश भाऊ महाजन यांनीही या घटनेचा तीव्र निषेध नोंदवत, “पत्रकारांचे रक्षण करणे ही समाजातील प्रत्येक जबाबदार व्यक्तीची कर्तव्य आहे. लोकशाही मजबूत ठेवण्यामध्ये पत्रकारांचा सिंहाचा वाटा आहे आणि त्यांच्या पाठीशी आम्ही भक्कमपणे उभे आहोत” असे सांगून पत्रकार बांधवांच्या मनात विश्वास निर्माण केला.
🙏 गिरीश भाऊ महाजन व आमदार मंगेश दादा चव्हाण या दोन्ही मान्यवरांची तातडीची धावपळ, दाखवलेली आपुलकी, पत्रकारांबद्दल व्यक्त केलेली कळकळ आणि दिलेला ठाम आधार या सर्व गोष्टींचे आज समाजात आणि पत्रकार वर्तुळात प्रचंड कौतुक होत आहे.
त्यांच्या भूमिकेमुळे केवळ पत्रकार बांधवांना नाही तर संपूर्ण जनतेला हा विश्वास वाटू लागला आहे की अन्यायाविरुद्ध उभे राहणारे लोकप्रतिनिधी अजूनही आहेत.

Post a Comment
0 Comments