मुख्य संपादक:- सौ सुनिता राजेंद्र महाडिक
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा:- 9273165283
जळगावात सहा ग्रॅम ‘एमडी’ ड्रगसह युवक अटक, साथीदार फरार
जळगाव – शहरात अमली पदार्थ विक्रीसाठी येणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेने गाठले. यामध्ये एकाला गजाआड करण्यात पोलिसांना यश आले असून दुसरा मात्र फरार झाला आहे. या कारवाईत तब्बल ६० हजार रुपये किमतीचा सहा ग्रॅम ‘एमडी’ (मेफेड्रोन) ड्रग, दोन मोबाईल फोन असा मिळून एकूण ८२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
शनिवारी रात्री तांबापुरा परिसरातील जे.के. पार्कजवळील स्विमिंग टॅंक शेजारी काही व्यक्ती अमली पदार्थ विक्रीसाठी येणार असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून कारवाई केली. त्यावेळी महमूद हनीफ पटेल (वय ३५, रा. मास्टर कॉलनी) हा संशयित पोलिसांच्या हाती लागला. त्याचा साथीदार अरमान चिंधा पटेल हा मात्र घटनास्थळावरून फरार होण्यात यशस्वी ठरला.
पोलिसांनी महमूद पटेल याची झडती घेतली असता, त्याच्याकडे सहा ग्रॅम एमडी ड्रग, तसेच दोन मोबाईल फोन आढळले. जप्त मालाची किंमत सुमारे ८२ हजार रुपये एवढी असून त्यापैकी ड्रगची किंमत तब्बल ६० हजार रुपये इतकी आहे.
सदरची कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या आरोपी महमूद पटेल याच्यासह फरार आरोपी अरमान पटेल या दोघांविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

Post a Comment
0 Comments