मुख्य संपादक:- सौ सुनिता राजेंद्र महाडिक
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा:- 9273165283
चाळीसगावकरांना नवरात्रीत नवी भेट – “संगम सेतू” पूल लोकार्पण
चाळीसगाव :
चाळीसगाव शहरातील दत्तवाडी येथे तितूर व डोंगरी नदीच्या संगमावर उत्तर महाराष्ट्रातील पहिला पोर्टल डिझाईन असलेला नवा पूल उभारण्यात आला असून, या पुलाचे लोकार्पण गुरुवार दि. २५ सप्टेंबर २०२५ रोजी संध्याकाळी ६ वाजता नवरात्र उत्सव आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सेवा पंधरवड्याच्या औचित्याने होणार आहे. या पुलाचे नामकरण “संगम सेतू” असे करण्यात आले आहे.
शहरातील अनेक जुनाट पुलांमुळे वाहतुकीच्या समस्यांना नागरिकांना सामोरे जावे लागत होते. या पार्श्वभूमीवर उभारण्यात आलेला “संगम सेतू” पुलामुळे रिंगरोड, बामोशी बाबा दर्गा, महाराणा प्रताप चौक, नागद रोड, घाट रोड, हुडको कॉलनी, प्रभात गल्ली या परिसरातील २० हजारांहून अधिक नागरिकांना दिलासा मिळणार आहे. तसेच जैन मंदिरापर्यंत जोड रस्त्याचे काँक्रीटीकरण पूर्ण झाले असून पुण्यश्लोक अहिल्यादेवी चौकापर्यंतचा रस्ता काँक्रीटीकरण लवकरच करण्यात येणार आहे.
हा पूल रात्रीच्या रोषणाईने उजळून निघणार असून शहराचे नवे आकर्षण ठरणार आहे. इच्छादेवी व कोदगाव रस्ता येथील पुलांचे बांधकामही प्रगतीपथावर असून भविष्यात गुजरीसह सर्व जुन्या पुलांचे पुनर्बांधणीचे प्रयत्न सुरू राहतील, अशी हमी जबाबदारांनी दिली आहे.
याचवेळी तितूर नदीच्या सुशोभीकरण कामाचे भूमिपूजनही होणार आहे. जवळपास ५ कोटी रुपयांच्या खर्चातून हे काम होणार असून येथे शहरवासीयांसाठी नयनरम्य चौपाटी विकसित होणार आहे. तसेच महिलांच्या बचत गटांसाठी “बहिणाबाई मार्ट” चे भूमिपूजन देखील या सोहळ्यात करण्यात येणार आहे. जिल्हा नियोजन समितीमार्फत २ कोटी ६७ लाख रुपयांचा निधी या कामासाठी मंजूर झाला आहे.
शहराच्या विकासाला चालना देणारे पूल बांधकाम, नदी सुशोभीकरण व महिला बचत गटांसाठी बाजारपेठ उपलब्ध करून देणारे प्रकल्प हे चाळीसगावकरांसाठी नवरात्रीच्या पावन पर्वावर एक मोठी भेट ठरणार आहेत.
आमदार मंगेश दादा चव्हाण – विकासाचे खरे शिल्पकार
चाळीसगाव शहर व परिसराचा विकास हा आज प्रत्येकाच्या डोळ्यासमोर उभा राहिलेला आहे, आणि या विकासामागे सातत्याने झटणारे नाव म्हणजे आमदार मंगेश दादा चव्हाण. राजकारण म्हणजे केवळ सत्ता नव्हे तर जबाबदारी आहे, हे दाखवून देणारे दादा प्रत्येक पावलावर लोकांच्या सेवेसाठी तत्पर राहतात.
दादांच्या कारकिर्दीत रस्ते, पूल, चौकांचे काँक्रीटीकरण, आधुनिक पायाभूत सुविधा, जलव्यवस्थापन, तसेच सामाजिक-सांस्कृतिक प्रकल्प यांचा मोठा वेगाने विकास झाला. नुकताच दत्तवाडी संगमावर उभारलेला उत्तर महाराष्ट्रातील पहिला पोर्टल डिझाईन असलेला “संगम सेतू” हा त्याचाच पुरावा आहे. हजारो नागरिकांच्या वाहतुकीच्या अडचणी सोडवणारा हा पूल म्हणजे चाळीसगावकरांना दादांनी दिलेली मोठी भेट आहे.
मंगेश दादांची कार्यशैली नेहमीच लोकाभिमुख राहिली आहे. प्रत्येक सामान्य माणसाच्या गरजा ओळखून त्या पूर्ण करण्यासाठी ते सतत प्रयत्नशील असतात. तितूर नदीचे सुशोभीकरण, शहरातील महिला बचत गटांसाठी “बहिणाबाई मार्ट”, रस्त्यांचे काँक्रीटीकरण, चौकांचे सौंदर्यीकरण अशा अनेक योजनांनी शहराला नवा चेहरा मिळत आहे. यामागे दादांची दूरदृष्टी, लोकहिताची बांधिलकी आणि निधी मिळवून आणण्याची क्षमता स्पष्ट दिसून येते.
दादांचे खास वैशिष्ट्य म्हणजे जनतेशी असलेले आपुलकीचे नाते. ते केवळ राजकीय नेते नसून प्रत्येकाच्या सुख-दुःखात सहभागी होणारे खरे समाजसेवक आहेत. कोणतीही अडचण असो, लोकांचा विश्वास आहे की “दादांकडे गेलो की तोडगा नक्की मिळतो.” हीच त्यांची खरी ताकद आहे.
आज चाळीसगाव शहर विकासाच्या नव्या पर्वावर आहे. “संगम सेतू” सारखी कामे ही केवळ पायाभूत सुविधा नव्हेत, तर दादांच्या विकासदृष्टीची ओळख आहेत. भविष्यात शहरातील जुने पूल, रस्त्यांची दुरुस्ती, नवीन प्रकल्प हे सर्व दादांच्या प्रयत्नांतून पूर्ण होतील, अशी खात्री नागरिक व्यक्त करत आहेत.
मंगेश दादा चव्हाण यांचे नेतृत्व हे चाळीसगावकरांसाठी अभिमानास्पद असून, त्यांचे कार्य हे पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे. शहराच्या सर्वांगीण विकासाचे शिल्पकार म्हणून त्यांचे नाव इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिले जाईल, यात शंका नाही.






Post a Comment
0 Comments