मुख्य संपादक:- सौ सुनिता राजेंद्र महाडिक
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा:- 9273165283
मुक्ताईनगर (20 नोव्हेंबर 2025) : मुक्ताईनगर तालुक्यात अवैध गांजा शेतीचे प्रमाण वाढत असल्याचे गांभीर्यपूर्ण चित्र पुन्हा एकदा उघड झाले आहे. निमखेडी शिवारात मोहन (उर्फ नीलेश) सिताराम बेलदार यांच्या शेतात पोलिसांनी धाड घालत तब्बल 200 गांजाची झाडे नष्ट केली. या झाडांपासून मिळालेल्या गांजाचे वजन सुमारे 510 किलो असून त्याची बाजारमूल्य अंदाजे 34 लाख 68 हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
ही कारवाई पोलीस निरीक्षक आशिष अडसूळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक जयेश पाटील व उपनिरीक्षक नयन पाटील यांच्या पथकाने केली. याबाबत पोलीस कॉन्स्टेबल दीपक ढाकरे यांनी फिर्याद नोंदवली असून पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, मुक्ताईनगर तालुक्यात गेल्या दोन दिवसांत ही दुसरी मोठी कारवाई ठरली आहे. काल मानेगाव येथून सुमारे 23 लाखांचा गांजा जप्त करण्यात आला होता. त्यातही आजच्या कारवाईत जवळपास 35 लाखांचा अवैध गांजा मिळाल्याने या गैरप्रकारावर कडक पावले उचलली जात असल्याचे संकेत मिळत आहेत.
दोन्ही प्रकरणांमध्ये ‘बेलदार’ आडनावाचे व्यक्ती आढळल्याने ते परस्परांना नातेवाईक आहेत का, याबाबत स्थानिकांमध्ये चर्चा रंगली आहे. मात्र, याबाबत अद्याप अधिकृत पुष्टी मिळालेली नाही.
पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, गाव परिसरात अवैध गांजा शेती अथवा अमली पदार्थ व्यवहाराबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास ती तातडीने पोलिसांना कळवावी, जेणेकरून या गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण आणता येईल.

Post a Comment
0 Comments