मुख्य संपादक:- सौ सुनिता राजेंद्र महाडिक
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा:- 9273165283
पाचोरा : आगामी सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर पाचोरा नगराध्यक्ष पदासाठी राजकीय वातावरण तापले असून शिवसेना शिंदे गटाच्या अधिकृत उमेदवार सौ. सुनीता ताई किशोर आप्पा पाटील यांच्या प्रचाराला दिवसेंदिवस जनतेचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. शहरातील विविध प्रभागांमध्ये घेतल्या जाणाऱ्या प्रचार दौऱ्यांमध्ये नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होत असून “नगरविकास आणि जनसेवेचा ध्यास” या घोषणेला जोरदार प्रतिसाद मिळताना दिसत आहे.
शहरातील मूलभूत प्रश्नांवर ठोस तोडगा, महिला सक्षमीकरण, पाणी पुरवठा, स्वच्छता व्यवस्था, तसेच तरुणांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करण्यावर भर देण्याचा सौ. सुनीता ताई यांचा निर्धार असून त्यामुळे जनतेचा कौल त्यांच्याकडे स्पष्टपणे झुकत असल्याचे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे.
शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्तेही उत्साहात असून दररोज मोठमोठे मेळावे, पदयात्रा, घर भेटींच्या माध्यमातून व्यापक जनसंपर्क केला जात आहे. शहरातील महिला, ज्येष्ठ नागरिक आणि युवक वर्ग यांच्याकडून मिळणारा कडाडून समर्थन हा आगामी निवडणुकीतील निकालाचा इशारा असल्याचे चित्र सर्वत्र पाहायला मिळत आहे.
“पाचोराच्या सर्वांगीण विकासासाठी सुनीता ताईंच्या नेतृत्वाची गरज” असा नारा आता सर्वच प्रभागांत बुलंद होऊ लागला आहे.
पाचोरा नगरपरिषदेसाठी ही निवडणूक ऐतिहासिक ठरणार असून, प्रचाराच्या या सुरुवातीच्या टप्प्यातच सौ. सुनीता ताई पाटील या नगराध्यक्ष पदाच्या शर्यतीत भक्कम आघाडीवर असल्याचे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
यावेळी पाचोरा शहरात विकास मार्गाला वेग देण्यासाठी सक्षम नेतृत्वाची गरज असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले असून, सौ. सुनीता ताई पाटील या भविष्याचा ठोस आराखडा घेऊन मैदानात उतरल्यामुळे मतदार त्यांना मोठ्या आशेने पाहत आहेत. प्रभागानुसार विशेष उपक्रम, आरोग्य सुविधा, युवकांसाठी क्रीडांगणे, तसेच शहराच्या सौंदर्यीकरणासाठी भरीव काम करण्याचे त्यांनी आश्वासन दिले आहे.
प्रचारातील उत्साह आणि लोकांचा वाढता सहभाग पाहता पाचोरात शिवसेना शिंदे गटाचे वातावरण अधिकच रंगतदार बनले असून, अंतिम टप्प्यात हा लाटेचा रूप घेईल असा आत्मविश्वास शिवसैनिकांमध्ये पाहायला मिळत आहे.

Post a Comment
0 Comments