बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा:- 9273165283
सो. योगिता मनोहर मोपकर
परभणी जिल्हा प्रतिनिधी
मराठवाडा व विदर्भाकारिता प्रतिनिधी नियुक्ती करणे आहे.
महिला करिता प्राधन
मोबाईल. नो. 9273165283/ 9156562110,
संविधानाने देशात समता निर्माण केली....जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण.
भारतीय संविधान हे सर्वांना समानता देणारे असून संविधानातील मूलभूत अधिकार जसे आपल्या साठी महत्त्वाचे आहेत त्याचप्रमाणे संविधानातील आपले कर्तव्याचे पालन करणे ही देखील आपली जबाबदारी आहे असे मनोगत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या जवळ संविधान दिन कार्यक्रमात व्यक्त केले.
संविधान साक्षरता अभियानाच्या वतीने दिनांक 26 नोव्हेंबर रोजी संविधान रॅली महात्मा जोतिबा फुले यांच्या पुतळ्यापासून ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या पर्यंत ही रॅली आयोजित करण्यात आली होती.
भारतीय संविधानाचा स्वीकार करून 26 नोव्हेंबर रोजी 75 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल संविधान साक्षरता अभियानाच्या प्रा.डॉ. प्रविण कनकुटे यांच्या पुढाकारातून आणि इतर संघटनाच्या वतीने संविधान रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
या रॅलीमध्ये संविधान साक्षरता अभियान, समता सैनिक दल, भारतीय बौद्ध महासभा, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, भीमशक्ती संघटना, एम आय. एम, वसंतराव नाईक हायस्कूल, यासह अनेक संघटनाचे प्रतिनिधी संविधानप्रेमी यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ झालेल्या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती म्हणून जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण, मोहम्मद गौस जेन, अँड. माधुरी क्षीरसागर, एम एम भरणे, डी. वाय खेडकर, यांच्या सह सतीश भिसे, भूषण मोरे, पप्पूराज शेळके, दीपक कनकुटे, डी.एस. खरात, सुनील कोकरे,सुहास पंडित, तातेराव वाकळे, राहुल कनकुटे, बबन वाहूले, यांनी रॅली यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले.
कार्यक्रमाला सर्व पत्रकार बंधू उपस्थित होते

Post a Comment
0 Comments