बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा:- 9273165283
सो. योगिता मनोहर मोपकर
परभणी ज़िल्हा प्रतिनिधी
*बार्टी, बौद्ध विद्यार्थी वस्तीग्रह व जि प प्रा शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने संविधान दिनानिमित्त निबंध, स्पर्धा, वस्तुनिष्ठ प्रश्न स्पर्धा घेण्यात आली व परितोषीक दिले*
जवळा बाजार : डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे सर्वप्रथम पुष्पहार अर्पण करून या कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली बार्टीचे महासंचालक सुनील वारे सर .विभाग प्रमुख बबन जोगदंड सर यांच्या मार्गदर्शनाने प्रकल्प अधिकारी सिद्धार्थ गोंवदे समतादूत मिलिंद आळणे, अँड रहीम कुरेशी यांनी शाळेचे मुख्याध्यापक बौद्ध विद्यार्थी वस्तीग्रहाचे अधीक्षक किरण मोरे यांनी निबंध,वस्तुनिष्ठ प्रश्न स्पर्धेचे संविधान दिनानिमित्त आयोजन केले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक मुळे हे होते.प्रमुख पाहुणे किरण मोरे अधीक्षक, समतादुत मिलिंद आळणे, अँड रहीम कुरेशी सूत्रसंचालन श्रीमती पाटील मॅडम यांनी केले हे होते. “भारताचे संविधान : मूल्ये व महत्त्व” या विषयावर निबंध,वस्तूनिष्ठ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. ही स्पर्धा _जिल्हा परिषद प्रशाला शाळा जवळा बाजार येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.
या स्पर्धेत वर्ग सातवी ते दहावी च्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी संविधानाची निर्मिती, त्यातील मूलभूत हक्क व कर्तव्ये, लोकशाहीची तत्त्वे आणि आजच्या काळातील संविधानाचे महत्त्व यावर सखोल विचार मांडले. अनेक विद्यार्थ्यांनी सामाजिक समता, न्याय आणि बंधुता या मूल्यांची गरज अधोरेखित केली.
स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून मुख्यायापक, मुळे सर,पाटील मॅडम, सोनवणे सर पटले सर व शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षीका यांनी काम पाहिले. उत्कृष्ट निबंधांची निवड करून प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक विजेत्यांची घोषणा करण्यात आली. विजेत्यांना प्रमाणपत्रे व पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.
या कार्यक्रमाचे आयोजन संविधानाबद्दल विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने करण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले. कार्यक्रमास शिक्षकवर्ग, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments