Type Here to Get Search Results !

तब्बल ६१ गॅस सिलेंडर चोरी प्रकरणाचा पोलिसांकडून पर्दाफाश – आयशर वाहनासह दोघांना अटक

 

मुख्य संपादक:- सौ सुनिता राजेंद्र महाडिक 

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा:- 9273165283



जळगाव | एमआयडीसी परिसरात घडलेल्या तब्बल ६१ गॅस सिलेंडर चोरीच्या गुन्ह्याचा एमआयडीसी पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत यशस्वी तपास करत पर्दाफाश केला आहे. या कारवाईत दोन आरोपींना जेरबंद करून त्यांच्याकडून चोरीस गेलेला माल व गुन्ह्यात वापरलेले आयशर वाहन जप्त करण्यात आले आहे.


१४ नोव्हेंबर रोजी भारत पेट्रोलियम कंपनीचे ३४२ रिफिलिंग सिलेंडर ट्रकमध्ये भरून पार्किंगला ठेवण्यात आले होते. मात्र १५ नोव्हेंबरला सकाळी ट्रक रस्त्याच्या कडेला हलवून ठेवलेला आढळला आणि तपासात ६१ सिलेंडर गायब असल्याचे उघडकीस आले.


गोपनीय माहितीनुसार पोलिसांनी सापळा रचत १८ नोव्हेंबरला आरोपी शेख फिरोज शेख याकुब (रा. नशिराबाद) यास ताब्यात घेतले. चौकशीत त्याने साथीदार सैय्यद मुश्ताक सैय्यद अशपाक (रा. उस्मानिया पार्क, जळगाव) यांच्या मदतीने चोरी केल्याची कबुली दिली. त्यांच्या कब्जातून १ लाख २२ हजार रुपयांचे सिलेंडर तसेच सुमारे ५ लाख किमतीचे आयशर वाहन जप्त करण्यात आले आहे.


एमआयडीसी पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. पोलिसांच्या तत्पर तपासामुळे मोठा चोरीयोग्य साठा पुन्हा सुरक्षित करण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments