मुख्य संपादक:- सौ सुनिता राजेंद्र महाडिक
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा:- 9273165283
📰 *छ.शाहू मराठा समाजाकडून रोहित जाधव यांचा भव्य सत्कार* — भाजपाच्या सांस्कृतिक आघाडीच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल समाजाच्या वतीने अभिनंदन
चाळीसगाव : *भारतीय जनता पार्टी सांस्कृतिक आघाडीचे जळगाव जिल्हाध्यक्ष* म्हणून रोहित जाधव यांची निवड झाल्याबद्दल राजश्री छत्रपती शाहू महाराज मराठा समाज, दक्षिण मराठा समाज चाळीसगाव यांच्या वतीने त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमास समाजाचे माजी अध्यक्ष भीमराव महाराज चव्हाण, तसेच समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. *लोकप्रिय आमदार मंगेशदादा चव्हाण यांचे विश्वासू सहकारी* म्हणून पक्षनिष्ठा, संघटन कौशल्य आणि कार्यतत्परतेच्या जोरावर रोहित जाधव यांना मिळालेली ही जिल्हा पातळीवरील जबाबदारी पक्ष नेतृत्वाने तरुण नेतृत्वावर दाखवलेला विश्वास असल्याचे समाजाने व्यक्त केले.
पोलीस पाटील संघटनेचे मा. तालुका अध्यक्ष विनायकराव मांडोळे म्हणाले, “समाजातील युवकांना पक्ष संघटनेत काम करण्याची संधी मिळते, हे अभिमानास्पद आहे. अशा निवडीमुळे समाजाचा सन्मान आणि स्वाभिमान अधिक दृढ होतो.”
सुनील पाटील यांनी म्हटले की, “सत्कार हा सन्मान नसून जबाबदारीची जाणीव आहे. पक्ष आणि समाज या दोन्ही क्षेत्रात न्याय व समतोल राखण्याचे कार्य रोहित जाधव सारखे युवक सक्षमतेने करतील.”
या कार्यक्रमाचे नियोजन *डॉ. प्रशांत एरंडे (खरजई) व संजयभाऊ कापसे यांनी केले. या वेळी भीमराव चव्हाण, विनायकराव मांडोळे, विलास बापू (चाळीसगाव), डॉ. पांगारे सर (देवळी), नानाभाऊ तांबे (खडकी), चिरागदादा मेंबर, जगदीश चव्हाण, सुजितदादा गायकवाड (माजी सरपंच खडकी), सुनील बोबडे (माजी उपसरपंच खरजई), सामाजिक कार्यकर्ते सुनील पाटील (पातोंडा), दीपक चव्हाण (खडकी), धनंजय मराठे* आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमात उपस्थित सर्वांनी रोहित जाधव यांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देत, समाज व पक्षासाठी अधिक जोमाने कार्य करण्याची अपेक्षा व्यक्त केली.

Post a Comment
0 Comments