Type Here to Get Search Results !

अंबरनाथ उड्डाणपुलावर भीषण अपघात; चार ठार, तीन जखमी

 

मुख्य संपादक:- सौ सुनिता राजेंद्र महाडिक 

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा:- 9273165283



अंबरनाथ (ठाणे): अंबरनाथ शहरातील पूर्व-पश्चिम भागाला जोडणाऱ्या उड्डाणपुलावर गुरुवारी रात्री उशिरा भीषण अपघात झाला. एका वेगाने धावणाऱ्या कारचे नियंत्रण सुटल्यानंतर समोरून येणाऱ्या दुचाकीस्वारांना जोरदार धडक देत चार जणांचा मृत्यू झाला आहे, तर तीन जण गंभीर ते किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, या चारचाकी वाहनात शिवसेना (शिंदे गट) च्या बुवापाडा प्रभागातून नगरपरिषद निवडणूक लढवणाऱ्या उमेदवार किरण चौबे उपस्थित होत्या. प्रचार संपवून घरी जात असताना ही दुर्घटना घडली. त्यांच्या कारने अचानक समोरून येत असलेल्या दुचाकींना धडक दिली.


या भीषण अपघातात दोन नगरपालिका कर्मचारी — शैलेश जाधव व चंद्रकांत अनर्थे, कारचालक लक्ष्मण शिंदे आणि पादचारी सुमित चेलानी यांचा मृत्यू झाला. तर तीन दुचाकीवरचे प्रवासी जखमी असून उमेदवार किरण चौबे यांना किरकोळ दुखापत झाली आहे.


धडक इतकी प्रचंड होती की काही दुचाकीस्वारांना हवेत उडून पुलाखाली कोसळल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. अपघातानंतर परिसरात एकच गोंधळ उडाला. स्थानिक नागरिकांनी तातडीने जखमींना रुग्णालयात हलवले.


अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटणे किंवा अचानक आरोग्य समस्या उद्भवणे अशी प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. अंबरनाथ पोलीस प्रकरणाचा अधिक तपास करीत असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे सत्यस्थिती उघडकीस आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.


या दुर्घटनेने अंबरनाथ शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Post a Comment

0 Comments