मुख्य संपादक:- सौ सुनिता राजेंद्र महाडिक
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा:- 9273165283
चाळीसगाव तालुक्यातील तरवाडे (ता. चाळीसगाव, जि. जळगाव) येथील कु. धनश्री उमेश शिंदे ही अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. घरातून नेहमीप्रमाणे बाहेर पडलेली धनश्री बराच वेळ झाला तरी घरी परत न आल्याने कुटुंबीयांनी परिसरात शोध सुरू केला. नातेवाईक, शेजारी, मित्रपरिवार तसेच जवळच्या गावांमध्ये चौकशी करूनही तिच्याबाबत कोणतीही ठोस माहिती मिळालेली नाही.
धनश्रीच्या बेपत्तामुळे कुटुंबीयांमध्ये तीव्र चिंता पसरली असून सर्व स्तरातून शोधकार्य सुरू आहे. नागरिकांनी आपापल्या परिसरात लक्ष ठेवावे, तसेच प्रवासादरम्यान किंवा सार्वजनिक ठिकाणी धनश्रीसदृश मुलगी आढळल्यास तात्काळ माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
धनश्रीबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास 9921323396 या क्रमांकावर त्वरित संपर्क साधण्याचे आवाहन कुटुंबीयांनी केले आहे. नागरिकांच्या सहकार्यामुळे मुलीचा लवकरात लवकर शोध लागेल, अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे.

Post a Comment
0 Comments