मुख्य संपादक:- सौ सुनिता राजेंद्र महाडिक
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा:- 9273165283
चाळीसगाव- धुळे रेल्वे लाईनला लागून करगाव रोडजवळ उभारण्यात येत असलेल्या मालवाहतुकीच्या रेल्वे धक्क्यासाठी मोठ्या प्रमाणात मुरूमाची गरज भासतेय. साईराम JV नावाच्या कंपनीने हे काम हाती घेतले असून, फक्त 500 ब्रास मुरूम वाहतुकीची अधिकृत परवानगी असताना, अवैधरित्या 3000 ब्रासपेक्षा अधिक मुरूम जागेवर पडलेला आहे—हा सरळसरळ महसूल बुडवण्याचा शॉकिंग प्रकार आहे.
रॉयल्टी म्हणून केवळ तीन लाख रुपये भरलेले असताना प्रत्यक्षात कोट्यवधी रुपयांचा मुरूम करगाव शिवारातून चोरीने काढला जातोय. उत्खनन डोन-दिगर दाखवून वास्तवात करगाव परिसरातूनच मोठ्या प्रमाणात कच्चा माल बाहेर नेला जातोय.
दररोज रात्री 12 ते पहाटे 5 या काळात 10 ते 12 डंपर बेधडकपणे धावत असतात. गौण खनिज वाहतुकीवरील कायदेशीर बंदीचा उघडपणे भंग होतोय, आणि महसूल प्रशासन, पोलीस प्रशासन, प्रांत कार्यालय आणि RTO विभाग पूर्णपणे डोळेझाक करत आहेत.
करगाव रोडचे प्रचंड नुकसान झाले आहे. रात्रो-रात्रो अवैध वाहतूक सुरू असून, प्रशासन मूकदर्शक बनले आहे. वारंवार तक्रारी करूनही महसूल, पोलीस किंवा RTO एकाही यंत्रणेने दखल घेतलेली नाही.
ही निष्क्रियता संशयास्पद आहे, संगनमताचा वास येतो आणि सरकारी यंत्रणांची प्रतिष्ठा प्रश्नचिन्हात येते.
तात्काळ मागण्या :
1. संबंधित सर्कल व तलाठी यांना तात्काळ निलंबित करावे.
2. बुडवलेला करोडो रुपयांचा मुरूम महसूल – तलाठी, सर्कल, ठेकेदार व कंपनीकडून वसूल करावा.
3. करगाव शिवारातील अवैध उत्खननावर तात्काळ संयुक्त कारवाई (महसूल, पोलीस, RTO) करावी.
4. अवैध वाहतूक होत असलेल्या डंपरवर त्वरित जप्तीची मोहीम राबवावी.
5. संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करावी – कोण अधिकारी संरक्षण देत आहेत त्याची सखोल चौकशी करावी.
महसूल प्रशासन, प्रांत, पोलीस व आरटीओ विभागाने याकडे दुर्लक्ष केले, तर राष्ट्रीय जनमंच पक्षाद्वारे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण आंदोलन सुरू करण्यात येईल असा इशारा पक्षामार्फत देण्यात आला आहे.
निवेदनावर प्रदेश सचिव संदीप लांडगे, प्रदेश संघटक देविदास वाघ जिल्हाध्यक्ष देविदास हटकर, जळगाव शहराध्यक्ष प्रमुख डोंगरे आदींच्या सह्या आहेत.
निवेदनाच्या प्रती
नाशिक विभागीय आयुक्त, पालकमंत्री जळगाव जिल्हा , महसूल मंत्री महाराष्ट्र राज्य यांना पाठवण्यात आलेल्या आहेत.

Post a Comment
0 Comments