मुख्य संपादक:- सौ सुनिता राजेंद्र महाडिक
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा:- 9273165283
चाळीसगाव तालुक्यातील तरवाडे (ता. चाळीसगाव, जि. जळगाव) येथे बेपत्ता असलेल्या अल्पवयीन मुलीचा मृतदेह गावाजवळील जंगलातील एका विहिरीत आढळल्याचे खात्रीशीर वृत्त समोर आले आहे. या घटनेने संपूर्ण गावात शोककळा पसरली असून नागरिकांमध्ये तीव्र हळहळ व्यक्त होत आहे. संबंधित मुलगी काही दिवसांपूर्वी बेपत्ता झाल्याची नोंद असून तिचा शोध कुटुंबीय, ग्रामस्थ व पोलीस यंत्रणा संयुक्तपणे घेत होते.
माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. विहिरीतून मृतदेह बाहेर काढून पंचनामा करण्यात आला असून . मृत्यूचे नेमके कारण, घटना कशी घडली, तसेच यात कोणताही गुन्हेगारी प्रकार आहे का, याबाबत पोलीस सर्व बाजूंनी तपास करीत आहेत.
या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून सर्व शक्यता पडताळून पाहिल्या जात आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली. तपास पूर्ण झाल्यानंतरच घटनेबाबतची अधिकृत माहिती स्पष्ट होणार आहे. दरम्यान, ग्रामस्थांनी शांतता राखून पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
भावपूर्ण श्रद्धांजली
चिमुकली बाळा,
तू खूप लहान होतीस,
तुझ्या निरागस हसण्याने
सगळ्यांचे मन आनंदी व्हायचे.
देव तुझ्या आत्म्यास शांती देवो,
तुला आपल्या चरणी स्थान देवो.
तू जिथे असशील तिथे सुखात राहो.
🌼 तिच्या आत्म्यास शांती लाभो 🌼
💐 भावपूर्ण श्रद्धांजली 💐

Post a Comment
0 Comments