मुख्य संपादक:- सौ सुनिता राजेंद्र महाडिक
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा:- 9273165283
योगिता मोपकर परभणी जिल्हा प्रतिनिधी
उत्तमचंद बगडिया महाविद्यालयात राष्ट्रीय ग्राहक दिन संपन्न
रिसोड -- येथील उत्तमचंद बगडिया कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात वाणिज्य विभागा च्या वतीने 24 डिसेंबर 2025 रोजी राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त प्राचार्य डॉ विनोद कुलकर्णी यांचे मार्गदर्शनाखाली एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वाणिज्य विभागप्रमुख प्रा. डॉ. ए जी वानखेडे तर प्रमुख वक्ते म्हणून प्रा. अरविंद मनवर, प्रा.राऊत उपस्थित होते सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते निष्काम कर्मयोगी संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले त्यानंतर प्रा डॉ कोमल काळे यांनी आपल्या प्रास्ताविकातून कार्यक्रमाची रूपरेषा विशद केली यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक प्रा. अरविंद मनवर यांनी विविध ग्राहक संरक्षण कायद्याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले तसेच प्रा राऊत यांनी सुद्धा आपल्या मार्गदर्शनपर भाषणात ग्राहकांचे अधिकार कर्तव्य व जबाबदारी याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच आपल्या अध्यक्षीय मनोगतात विभाग प्रमुख प्रा डॉ अजाबराव वानखेडे यांनी ग्राहक संरक्षण कायदा 1986 याविषयी सविस्तर अशी मार्गदर्शन करून आजच्या डिजिटल व ई-कॉमर्स युगात आपली फसवणूक होणार नाही याकरिता ग्राहकांनी सजग असले पाहिजे तसेच ग्राहकांची फसवणूक झाल्यास ग्राहक मंचामध्ये ग्राहक आपली तक्रार नोंदवू शकतो असे प्रतिपादित केले या कार्यक्रमाचे संचालन कु अंजली पुंड हिने तर आभार प्रदर्शन प्रीतम वैरागड याने केले ह्या कार्यक्रमाकरिता वाणिज्य शाखेतील प्रा. दशरथ प्रजापती, प्रा. डॉ. कोमल काळे, प्रा. अरविंद मनवर, प्रा राऊत ,डॉ मंगल खेडेकर, इतर शाखेतील प्राध्यापक उपस्थित होते ह्या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता वाणिज्य विभागातील कु. देव्हारे, कु शर्मा, आरजू दळवी,कु.मोहिनी कोठारी, कु,अंजली पुंड, कु. सदार कु.मधु कांबळे, दिव्या खोटे, पल्लवी खिल्लारे,प्रीतम वैरागड, कार्तिक सावके, सिद्धांत तुरुकमाने, गौरव काळे, इत्यादींनी विशेष परिश्रम घेतले


Post a Comment
0 Comments