Type Here to Get Search Results !

निवडणूक एक अनुभव....भाग 2 लेखन सौ ललिता ताई पाटील

 

मुख्य संपादक:- सौ सुनिता राजेंद्र महाडिक 

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा:- 9273165283



महाराष्ट्रात नुकत्याच 288 नगरपालिका निवडणूक रिंगणात उतरल्या होत्या त्यापैकीच पाचोरा भडगाव या दोन नगरपालिका आमच्या क्षेत्रात होत्या एकूणच निवडणूक जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता त्यानंतर प्रचाराला सुरुवात...

प्रचाराचा नारळ फोडून प्रचार रॅली प्रचार सभा याचा जणू धडाकाच होता... या 15 ते 20 दिवसाच्या कालावधीत फक्त आणि फक्त राजकारण, पक्ष, उमेदवार या पलीकडे दुसरा विचार नव्हताच .. या सर्व वातावरणाचा अनुभव घेता घेता नकळतच अनेक वास्तव अनुभव आले..

सर्वात आधी हे नमूद करू इच्छिते की नेहमीप्रमाणेच माझं लिखाण एक सामान्य आणि जबाबदार नागरिक म्हणून असणार कुठल्याही पक्षाच्या किंवा नेत्याच्या बाजूने किंवा विरोधात नसणार ,...

खरंतर विधानसभेच्या वेळेस जे अनुभव अनुभवले त्यानंतर कुठल्याही निवडणुकीचा भाग न होण्याचं निश्चित केलं होतं पण

पण काय करणार अनुभव घेण्याची सवय लागली, हीं नगरपालिका निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर आधारित होती आणि विकासाच्या बाजूनेच नागरिकांनी कौल दिला परंतु काही अनुभव घेऊन भविष्यातील राजकारणाची अर्थातच लोकशाहीची चिंता सुज्ञ मनांना नक्कीच भेडसावत असेल... जर एखादी व्यक्ती कुठलाही स्वार्थ न बघता समाजकारणात स्वतःला वाहून घेत असेल तर त्याचे राजकारणातील अस्तित्व काय याची उत्तर जनतेने शोधावे कारण राजकारण म्हटलं म्हणजे आणि निवडणूक म्हटलं म्हणजे लोकांच्या नजरेसमोर एकच ध्येय असते मतदानाच्या दिवशी आपल्यापर्यंत कोण पोहोचते हेच ध्येय ठेवून जर मतदार मतदान करत असतील तर त्यांनी विकास विसरावा.. आपल्याला अधिकार काय असतो प्रश्न विचारण्याचा आपण आपला अधिकार त्याच दिवशी सोडतो ज्या दिवशी आपण मतदानाला 4 वाजेनंतर निघतो मला काय म्हणायचे ते समजलंच असेल ही गोष्ट लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहे जरा स्पष्टच बोलते सदन कुटुंबातील सदस्य देखील लक्ष्मीची वाट बघतात..

आजच्या मूलभूत गरजा प्रत्येक हाताला काम हे खूप महत्त्वाचे आहे काही थोडे लोक सोडले तर प्रत्येकाचा प्रापंचिक प्रश्न आज ऐरणीवर आहे, समाजात रूट लेवलला काम करताना आमच्यासारखा समाज सेवकांना अनेक ज्वलंत प्रश्नांना सामोरे जावे लागते... त्याच ठिकाणी हतबलता वाटते, हे महत्त्वाचे प्रश्न सहजच दुर्लक्षित केले जातात...

जर अधिकार आणि सत्ता नसेल तर आम्हीही काही करू शकत नाही कारण एक मर्यादा येते...*यात कोणत्याही नेत्यांचा काहीच दोष नाही किंवा उमेदवारांचा दोष नाही दोष आहे तो जनतेचा* कारण प्रश्न असतो मतदानाच्या टक्केवारीचा एक मत देखील निर्णायक ठरते....

मतदाराने जर ठामपणे सांगितले आम्हाला फक्त आमच्या मूलभूत सुख सुविधा हवे आहेत एक दिवसाचे पाकीट नको तर का योग्य आणि प्रामाणिक उमेदवार पुढे होणार नाहीत जर निवडणूक प्रक्रियेपासून मतमोजणीच्या प्रक्रियेपर्यंत तुम्ही त्या उमेदवाराला आर्थिक दरीत ढकलत असाल तर तो पुढील पाच वर्षे तुमचे काय काम करेल याचा विचार करा कारण एकदा फॉर्म भरला तिकीट मिळाले प्रत्येक जण पोट तिडकीने आपल्या प्रचारात उतरतो तरी शेवटच्या दिवशी जर आपली मानसिकता बदलत नसेल त्यांचा तरी काय दोष.....

या प्रक्रियेमध्ये प्रामाणिक लोके देखील आहेत जे सकाळी सात वाजता जाऊन आपल्या मतदानाचा अधिकार बजावून येतात ना कोणाची वाट बघणं ना कुठली अपेक्षा ठेवन परंतु ही लोकं बोटावर मोजणे इतकीच आहेत....

असे मतदार भविष्यातील राजकारणाचा आशेचा किरण बनू शकतात....,

परंतु दिवसेंदिवस ही संख्या कमी होत चालली आहे, खरंतर भडगाव पाचोरा येथील निवडणुका विकासाचा मुद्दा केंद्रस्थानी ठेवून लढल्या गेल्या आणि जनतेने कौलही दिला.. पण सत्ताधारी असतील किंवा विरोधक असतील प्रत्येकाला प्रचंड आर्थिक फटका बसला..

मग या सगळ्या गोष्टी असताना आपण अपेक्षा का करायची हो आपण काम घेऊन गेलो आणि एका शब्दात आपले काम झाले. विचार करा......


सौ ललिता ताई पाटील 

संचालिका स्पंदन कौन्सिल सेंटर पाचोरा 

9922092896

Post a Comment

0 Comments