Type Here to Get Search Results !

जळगाव जिल्हा शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे यांच्या गाडीवर दगडफेक; काच फुटल्याने खळबळ

 


मुख्य संपादक:- सौ सुनिता राजेंद्र महाडिक 
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा:- 9273165283


जळगाव जिल्ह्यातील शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे यांच्या वाहनावर अज्ञात व्यक्तींनी दगडफेक केल्याची घटना घडली असून, या हल्ल्यात गाडीची काच फुटली आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती आहे.

घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. दगडफेक करणारे हल्लेखोर नेमके कोण होते आणि हल्ल्यामागचे कारण काय, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

या घटनेचा शिवसेनेकडून तीव्र निषेध करण्यात आला असून दोषींवर तात्काळ कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न असल्याचा आरोपही करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments