मुख्य संपादक:- सौ सुनिता राजेंद्र महाडिक
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा:- 9273165283
सो.योगिता मनोहर मोपकर
परभणी ज़िल्हा प्रतिनिधी
मांगवाडी येथे उत्तमचंद बगडिया महाविद्यालयाचे विशेष श्रमसंस्कार शिबिर उत्साहात; विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन
रिसोड: स्थानिक उत्तमचंद बगडिया कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने मांगवाडी येथे १६ जानेवारी ते २३ जानेवारी २०२६ या कालावधीत 'विशेष श्रमसंस्कार शिबिराचे' आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराच्या माध्यमातून ग्रामीण विकास आणि प्रबोधनाचे विविध कार्यक्रम राबविले जाणार आहेत.
शिबिराचा मुख्य कार्यक्रम:
१७ जानेवारी २०२६: ग्राम स्वच्छता अभियान आणि शिबिराचे रीतसर उद्घाटन. या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य विनोद कुलकर्णी आणि रिसोडचे पोलीस निरीक्षक रामेश्वर चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
१८ जानेवारी २०२६: श्रमदान व ग्राम स्वच्छता. या दिवशी तालुका कृषी अधिकारी तावरे सर हे 'शेतकऱ्यांसाठी कृषी योजना व पाणलोट व्यवस्थापन' यावर मार्गदर्शन करतील. तसेच, 'समाज जागृतीत पत्रकारांची भूमिका' या विषयावर मोहनराव देशमुख, डॉ. मनोहर मोपकर, विवेकानंद ठाकरे, केशव गरकळ, वसमतकर सर, ओंकार सर आणि रवीभाऊ अंभोरे हे पत्रकार मार्गदर्शन करतील. रात्री जयंती हॅलोडे सर यांचे 'अंधश्रद्धा निर्मूलन' यावर व्याख्यान होईल.
१९ जानेवारी २०२६: 'समाज विकासात युवकाची भूमिका' यावर संजय देशमुख सर यांचे मार्गदर्शन होईल. तसेच केशव महाराज वाळके हे 'गाडगेबाबांचे विचार' मांडतील. या दिवशी महिलांशी संवाद व सांस्कृतिक कार्यक्रमही होतील.
२० जानेवारी २०२६: 'माझा कचरा माझी जबाबदारी' (प्रा. डी. जी. गवळी), 'शिक्षण व्यवस्थेतील बदल व रोजगार' (प्राचार्य संजय भांडेकर) आणि 'डिजिटल साक्षरता' (सोळंके सर) या विषयांवर सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे.
२१ जानेवारी २०२६: पशु चिकित्सा व लसीकरण शिबिर, तसेच 'स्त्री शिक्षण व महिला सक्षमीकरण' यावर चर्चा होईल.
२२ जानेवारी २०२६: आरोग्य निदान शिबिर आणि विविध सामाजिक विषयांवर चर्चासत्र आयोजित केले आहे.
२३ जानेवारी २०२६: शिबिराचा समारोप संस्थेचे अध्यक्ष उत्तमशेठ बगरिया यांच्या उपस्थितीत संपन्न होईल.
या सात दिवसीय शिबिरात ग्रामस्थांनी व तरुणांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन राष्ट्रीय सेवा योजना समितीच्या वतीने करण्यात आले आहे.




Post a Comment
0 Comments