Type Here to Get Search Results !

कन्नड घाटात भीषण कार अपघात; तिघांचा जागीच मृत्यू, चौघे गंभीर जखमी

 

मुख्य संपादक:- सौ सुनिता राजेंद्र महाडिक 

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा:- 9273165283



चाळीसगाव : कन्नड घाट परिसरात ७ जानेवारीच्या रात्री घडलेल्या भीषण कार अपघाताने शेवगाव शहरासह परिसरात शोककळा पसरली आहे. या अपघातात शेवगाव येथील तिघांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला असून चौघे जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, शेवगाव येथील सात तरुण कारमधून प्रवास करत होते. ७ जानेवारीच्या रात्री उशिरा कन्नड घाट परिसरात त्यांची कार आली असता घाटातील तीव्र वळणावर चालकाचा ताबा सुटला. परिणामी कार रस्त्यालगत असलेल्या दरीत कोसळली. अपघात इतका भीषण होता की कारचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून काही प्रवासी वाहनात अडकून पडले होते.


अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदतीसाठी धाव घेतली. तसेच ग्रामीण पोलिसांनीही घटनास्थळी पोहोचून बचावकार्य सुरू केले. मोठ्या प्रयत्नांनंतर जखमींना कारमधून बाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.


अपघातात जखमी झालेल्यांची नावे —


योगेश तुकाराम सोनवणे

(वय २८, रा. शेवगाव)


अक्षय शिवाजी गिरे

(वय २५, रा. शेवगाव)


ज्ञानेश्वर कांता मोडे

(वय २४, रा. शेवगाव)


तुषार रमेश घुगे

(वय २६, रा. शेवगाव)


या दुर्दैवी अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे —


तुकाराम रामभाऊ अंभोरे

(वय २७, रा. शेवगाव)


शेखर रमेश दुरपते

(वय ३१, रा. शेवगाव)


घनशाम रामहरी पिसोटे

(वय ३०, रा. शेवगाव)


अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र घाटातील अंधार, तीव्र वळणे आणि वाहनाचा वेग यामुळे अपघात घडल्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे. सध्या या प्रकरणी कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नसून, पुढील तपास सुरू आहे. लवकरच गुन्हा दाखल होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.


या भीषण अपघातामुळे शेवगाव परिसरात शोककळा पसरली असून तरुण वयातील तिघांच्या मृत्यूमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. मृतांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात शोकाकुल वातावरण आहे.

Post a Comment

0 Comments