Type Here to Get Search Results !

संस्कृती विद्यानिकेतनमध्ये मातृ पित्र पुजन व स्नेह - आश्रमास भेट.

 


मुख्य संपादक:- सौ सुनिता राजेंद्र महाडिक 

संपादक:- मुकेश राजेंद्र महाडिक 

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा:- 9273165283


सो. योगिता मनोहर मोपकर 

परभणी ज़िल्हा प्रतिनिधी 



संस्कृती विद्यानिकेतनमध्ये मातृ पित्र पुजन व स्नेह - आश्रमास भेट.

संस्कृती विद्यानिकेतनमध्ये नेहमीच संस्कृतीचे जनन, संरक्षण व संवर्धन केले जाते. भारतात रुजू होत असलेल्या काही पाश्चिमात्य बाबींना योग्य वयातच आळा घालणे आवश्यक असते, आपल्या भारतीय संस्कृतीत आई-वडिलांना आपण देवस्थानी मानतो. भारतीय संस्कृतीत मातृ देवो भव: पितृ देवो भव: म्हणतात. म्हणूनच ह्या संस्कृतीची लहान वयातच मुलांना ओळख व्हावी, या उद्देशाने मातृ-पितृ पुजन करण्यात आले. या कार्यक्रमा प्रसंगी शाळेचे पालक प्रतिनिधी श्री व सौ. सोनी श्री व सौ. देशमाने आणि श्री व सौ रघुवंशी हे दाम्पत्य उपस्थित होते. त्यांच्या पाल्यांनी पारंपारिक पद्धतीने आपल्या आई-वडिलांचे पुजन केले.

तसेच लहान वयापासूनच मुलांना आई-वडिल, आजी- आजोबा यांच्या विषयी आदरभाव निर्माण व्हावा म्हणून, मातृ-पितृ पुजनाचे औचित्य साधून शाळेतर्फे विद्यार्थ्यांना 'असोला सेथील ज्येष्ठ नागरिक महिला स्नेह आश्रमास' भेट दिली. तिथे शाळेचे प्राचार्य श्री व सौ. अक्षय देसरडा, श्री प्रदीप चौधरी, प्रेरणा मुथा उपस्थित होत्या,

तेथील महिलांसाठी विदयार्थ्यांनी विविध कार्यक्रम घेतले. विद्यार्थ्यांनी स्वतः बनवलेले ग्रिटींग कार्ड देवून त्यांचे आशीर्वाद घेतले. शाळेचा हा उपक्रम पाहून आश्रमातील महिलांना आनंद झाला. शाळेचे प्राचार्य यांनी आजपासून प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपल्या आई-वडिलांसाठी आदरभाव दाखवावा असे मनोगतात व्यक्त केले.

1. प्रमुख अतिथी श्री प्रदीप चौधरी, व संस्कृती विद्यानिकेतन शाळेच्या वतीने स्नेह आश्रमातील महिलांना आरोग्स किट व अल्पोपहार देण्यात आला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सौ वझरकर, बतूल फातेमा व इतर सर्व शिक्षक वृंद व कर्मचारी वृंद यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments