Type Here to Get Search Results !

नाफेड मार्फत हरभरा खरेदीसाठी नोंदणीला सुरुवात

 

मुख्य संपादक:- सौ सुनिता राजेंद्र महाडिक 

संपादक:- मुकेश राजेंद्र महाडिक 

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा:- 9273165283


परभणी ज़िल्हा प्रतिनिधी 

सो. योगिता मनोहर मोपकर (रिसोडकर )



नाफेड मार्फत हरभरा खरेदीसाठी नोंदणीला सुरुवात


हंगाम 2025-26 साठी 31 मार्चपर्यंत नोंदणी करण्याचे आवाहन


परभणी, दि. 4 (जिमाका) : महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ, मुंबई व नाफेड, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने हंगाम 2025-26 मध्ये जिल्ह्यात केंद्र शासनाने निश्चित केलेल्या किमान आधारभूत दरानुसार हरभरा (चना) खरेदी योजना राबविण्यात येत आहे.


केंद्र शासनाने हरभरा (चना) पिकासाठी 5875 रुपये प्रति क्विंटल असा आधारभूत दर निश्चित केला आहे. शेतकरी नोंदणी दि. 31 मार्च 2026 पर्यंत सुरू राहणार असून प्रत्यक्ष खरेदी दि. 01 मार्च 2026 पासून पुढील 60 दिवस करण्यात येणार आहे.


परभणी जिल्ह्यात जिंतूर, पुर्णा, मानवत, सोनपेठ, बोरी, परभणी, वरपुड व मिरखेल या ठिकाणी नियुक्त खरेदी केंद्रांवर शेतकरी नोंदणी व खरेदी प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.


नोंदणी ही ऑनलाईन पद्धतीने पीओएस मशिनद्वारे करण्यात येणार असून शेतकऱ्यांनी आधारकार्ड, बँक पासबुक, चालू वर्षाचा सातबारा उतारा व पिकपेरा आदी कागदपत्रांसह संबंधित खरेदी केंद्रावर उपस्थित राहणे आवश्यक आहे. नोंदणी पूर्ण झाल्यानंतर एसएमएस प्राप्त झाल्यावरच शेतकऱ्यांनी शेतमाल विक्रीसाठी केंद्रावर हरभरा आणावा.


सदर योजना शेतकऱ्यांच्या शेतमालास हमीभाव मिळावा यासाठी राबविण्यात येत असून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी कुंडलिक शेवाळे यांनी केले आहे.


Post a Comment

0 Comments