मुख्य संपादक:- सौ सुनिता राजेंद्र महाडिक
संपादक:- मुकेश राजेंद्र महाडिक
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा:- 9273165283
परभणी ज़िल्हा प्रतिनिधी
सो. योगिता मनोहर मोपकर (रिसोडकर )
कोटपा कायद्याअंतर्गत 10 पानटपरी चालकांवर दंडात्मक कारवाई
परभणी दि. 4 (जिमाका) : राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत दि. 02 मार्च, 2026 रोजी परभणी शहरातील वसमत रोड, शिवाजी कॉलेज परिसरात कोटपा कायदा उलंघन करणाऱ्या 10 पानटपरी चालकांवर कारवाई करत 2 हजार 550 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
सदर कारवाई तंबाखू नियंत्रण कक्ष जिल्हा रूग्णालयाचे जिल्हा सल्लागार डॉ. रुपाली रणवीरकर, मानसशास्त्रज्ञ केशव गव्हाणे, नवा मोंढा पोलिस स्टेशनचे अमंलदार विनायक काडे, सुर्यकांत गडगिळे, अन्न व औषध प्रशासनचे वैभव ठोंबरे, कृष्णा मुळे, मराठवाडा ग्रामीण विकास संस्थेचे मंगेश गायकवाड ह्या पथकाद्वारे कारवाई करण्यात आली.
कोटापा कायदा म्हणजे काय?
सिगारेट आणि तंबाखूजन्य उत्पादने प्रतिबंध कायदा अधिनियम 2003 हा केंद्राचा कायदा आहे. या कायद्यात एकूण पाच कलमे आहेत. त्यापैकी सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करणे गुन्हा आहे. कोणत्याही शैक्षणिक संस्थेच्या 100 यार्ड आवारात तंबाखूजन्य पदार्थ विक्रीवर प्रतिबंध आहे. तसेच 18 वर्षा खालील मुला-मुलीना तंबाखूजन्य पदार्थ विकणे किंवा विक्री करावयास लावणे हे देखील कायद्याने गुन्हा आहे.
शासकीय कार्यालायात धुम्रपान करणे, तंबाखू खाणे किंवा थुंकणे यावर बंदी आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाने या संदर्भात आदेश लागू केले आहेत. तंबाखूचा धूर आणि तंबाखूजन्य पदार्थ सेवन केल्याने तेथील लोकांच्या आरोग्यांवर विपरीत परिणाम होऊ शकते, हे लक्षात घेऊन हि बंदी घातली आहे.
तंबाखू मुक्त शाळा धोरण?
तंबाखू मुक्त शाळा धोरण म्हणजे शाळांमध्ये तंबाखूचा वापर पूर्णपणे थांबविण्यासाठी आणि विद्यार्थ्यांमध्ये तंबाखूच्या सेवनाला प्रतिबंध करण्यासाठी तयार केलेले नियम आणि उपाययोजना विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि सुरक्षितता हाच मुख्य उद्देश आहे.

Post a Comment
0 Comments