मुख्य संपादक:- सौ सुनिता राजेंद्र महाडिक
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा:- 9273165283
परभणी ज़िल्हा प्रतिनिधी
सो. योगिता मनोहर मोपकर (रिसोडकर )
खादी व ग्रामोद्योग योजनेंतर्गत उद्योजकांना कर्जमंजुरीपत्रांचे वितरण; शाखाधिकाऱ्यांचा सत्कार
परभणी, दि. 4 (जिमाका) : जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत जिल्ह्यातील महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या पीएमईजीपी, सीएमईजीपी व विश्वकर्मा योजनेंतर्गत कर्ज मंजूर झालेल्या उद्योजकांना कर्ज मंजुरीपत्रांचे वितरण करण्यात आले.
यावेळी उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या बँक शाखाधिकाऱ्यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कारही करण्यात आला. यामध्ये बँक ऑफ बडोदाचे रमणकुमार सौदागर, बँक ऑफ इंडियाचे सूर्यकांत केंद्रे, युनियन बँक ऑफ इंडियाचे ज्ञानेश्वर दापकर, स्टेट बँक ऑफ इंडियाचे श्री. वानखेडे, महाराष्ट्र ग्रामीण बँकचे सूर्यकांत हेडाऊ तसेच लीड बँक अधिकारी रामचंद्र अकुलवार यांचा समावेश होता.


Post a Comment
0 Comments