मुख्य संपादक:- सौ सुनिता राजेंद्र महाडिक
संपादक:- मुकेश राजेंद्र महाडिक
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा:- 9273165283
नगरदेवळा सिम, ता. पाचोरा | ९ ऑगस्ट २०२६
जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून नगरदेवळा सिम येथे आदिवासी समाजाच्या शौर्य, संघर्ष आणि गौरवशाली इतिहासाचे प्रतीक असलेल्या क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या स्मारकाचे भूमिपूजन उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. या कार्यक्रमामुळे नगरदेवळा सिमसह परिसरातील आदिवासी बांधवांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
कार्यसम्राट आमदार मा. श्री. किशोरआप्पा पाटील यांच्या विकास निधीतून मंजूर झालेल्या या स्मारकाचे भूमिपूजन शिवसेना जिल्हाप्रमुख तथा मा. जि.प. सदस्य मा. रावसाहेब (जिभू) पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी ग्रामस्थ, आदिवासी समाजबांधव, महिला-भगिनी, युवक आणि विविध मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
क्रांतिकारक राघोजी भांगरे यांनी अन्याय आणि अत्याचाराविरोधात संघर्ष करत आपल्या समाजाच्या हक्कांसाठी लढा दिला. त्यांचे शौर्य, त्याग, स्वाभिमान आणि संघर्षाची प्रेरणा आजही समाजासाठी मार्गदर्शक आहे. त्यामुळे त्यांच्या स्मृतींना कायमस्वरूपी उजाळा देणारे स्मारक उभारले जाणे ही नगरदेवळा सिमसह संपूर्ण आदिवासी समाजासाठी अभिमानाची बाब असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
जि.प. सदस्य व भडगाव तालुक्याचे भावी आमदार श्री रावसाहेब पाटील यांच्या नेतृत्वाचे कौतुक
नगरदेवळा सिम येथे क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या स्मारकाच्या भूमिपूजनासाठी मा. रावसाहेब (जिभू) पाटील यांची उपस्थिती ग्रामस्थांसाठी विशेष प्रेरणादायी ठरली. सर्वसामान्यांशी जिव्हाळ्याचे संबंध ठेवणारे आणि समाजाच्या प्रश्नांकडे संवेदनशीलतेने पाहणारे नेतृत्व म्हणून रावसाहेब पाटील यांच्याकडे पाहिले जाते. आदिवासी समाजाच्या गौरवशाली इतिहासाचे जतन व्हावे आणि नव्या पिढीला आपल्या शूर पूर्वजांच्या संघर्षाची प्रेरणा मिळावी, या दृष्टीने स्मारक उभारणीसारख्या उपक्रमांना त्यांनी दिलेले प्रोत्साहन कौतुकास्पद आहे.
जागतिक आदिवासी दिनानिमित्त उपस्थित आदिवासी बांधव-भगिनी, युवक आणि नागरिकांना शुभेच्छा देताना त्यांनी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी एकजुटीने प्रयत्न करण्याचे आवाहन केले. विकासकामांसोबतच सामाजिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारशाचे जतन करणेही तितकेच महत्त्वाचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यांच्या संयमी, लोकाभिमुख आणि विकासाभिमुख भूमिकेमुळे ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले. स्मारकाच्या भूमिपूजनाचा हा कार्यक्रम रावसाहेब पाटील यांच्या नेतृत्वातून समाजाच्या इतिहासाला आणि अस्मितेला दिलेला सन्मान म्हणूनही पाहिला जात आहे.
नगरदेवळा सिम येथे उभारण्यात येणारे हे स्मारक केवळ एक वास्तू न राहता क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या शौर्याची, त्यागाची आणि स्वाभिमानाच्या लढ्याची कायमस्वरूपी प्रेरणाज्योत ठरेल, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
याप्रसंगी मा. सरपंच प्रकाश परदेशी, रोशन पाटील, ताराचंद पाटील, संभाजी पाटील यांच्यासह समाजबांधव, महिला-भगिनी, तरुणवर्ग आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.






Post a Comment
0 Comments