मुख्य संपादक:-सुनीता राजेंद्र महाडिक
अंबरनाथ, जिल्हा ठाणे या शहराची ओळख प्राचीन शिव मंदिर मुळे झालेली आहे. सुमारे ९५० वर्षांपूर्वी शिलाहार राजाने या मंदिराची निर्मिती केलेली आहे. अतिशय सुबक व दर्जेदार नक्षी असलेल्या या प्राचीन शिव मंदिराला पाहण्यासाठी देशभरातून भक्त भाविक येत असतात. दरवर्षी महाशिवरात्रीनिमित्त अंबरनाथ शहरात जत्रा भरत असते या जत्रेमध्ये देशभरातून पाच ते सहा लाख भाविक दर्शनासाठी येत असतात. सध्या शिव मंदिर परिसर येथे कोरीडोअरच्या कामानिमित्त कायापालट करण्याचे काम सुरु असून पुजारी, हार फुल भंडार, रिक्षा संघटना, भक्त निवास तसेच इतर रूपाने मोठ्या प्रमाणात स्थानिकांना रोजगार निर्मिती होणार आहे. अंबरनाथ हे नावं, शहराची ओळख ही प्राचीन शिवमंदिरातूनच निर्माण झाली असून ठाणे जिल्ह्यात ह्या वास्तूची नाळ भक्तांशी भाविनक जुडली आहे, तरी आपण अंबरनाथ शहरातील प्राचीन शिव मंदिर "श्री तिर्थ क्षेत्र" घोषित करावे ही विनंती महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. श्री. एकनाथजी शिंदे साहेब तसेच महाराष्ट्र राज्याचे पर्यटन मंत्री मा. श्री. शंभूराजजी देसाई साहेब यांना पत्राद्वारे केली.


Post a Comment
0 Comments