मुख्य संपादक:- सुनिता महाडिक
Maharashtra Weather Update: राज्यात बहुतांश ठिकाणी कमाल तापमानाचा पारा 35-39 अंश सेल्सियस एवढा गेलाय. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, देशात सोलापुरात तापमानाचा पारा सर्वाधिक 39.4 अंश सेल्सियस एवढा नोंदवला गेला. मंगळवारी (4 मार्च) दक्षिण मध्य महाराष्ट्रात हलक्या पावसाचा इशारा देण्यात आला होता. त्यामुळे मध्य महाराष्ट्रात अनेक भागात मंगळवारी ढगाळ वातावरण होतं. कमाल तापमानात काहीसा दिलासा मिळाला असला तरी तापमान चढेच असल्याचे दिसले. (IMD Forecast)
राज्यात कुठे कसे तापमान होते?
अहमदनगर - 35.8°C, अकोला 38.6°C, अमरावती - 36.8°C, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) - 37.0°C, बीड 35.5°C, बुलढाणा -35.0°C, चंद्रपूर - 38.0°C, गडचिरोली- 37.2°C, गोंदिया - 35.8°C, जळगाव - 36.0°C, कोल्हापूर -(दिसत नाही), लातूर - 36.0°C, मुंबई शहर -31.8°C, मुंबई उपनगर - 35.3°C, नागपूर -36.9°C, नाशिक - 36.3°C, उस्मानाबाद -35.8°C, पालघर - 33.1°C, परभणी- 38.0% पुणे - 37.7°C, रायगड - 34.4°C, रत्नागिरी -31.7°C, सांगली - 37.9°C, सातारा - 37.5°C
येत्या 5 दिवसात कसे राहणार हवामान ?
प्रादेशिक हवामान केंद्राने दिलेल्या अंदाजानुसार, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पुढील 3-4 दिवस तापमानात मोठा बदल होणार नाही, त्यानंतर हळूहळू वाढ होईल. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात किमान तापमान 2-3°C ने घटणार असून, दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात त्यानंतर हळूहळू वाढ होईल. विदर्भात पुढील 2 दिवस कमाल तापमान 2-3°C ने कमी होईल, त्यानंतर पुन्हा वाढ होईल. तसेच, किमा तापमान देखील 2-3°C ने घटून पुढील 2 दिवसांत

Post a Comment
0 Comments