मुख्य संपादक:- सुनिता राजेंद्र महाडिक
बातमी व जाहिराती साठी संपर्क करा:- 9273165283
सौ. स्वप्नाली ताई शिंदे यांनी
आज दिनांक २९ जुलै २०२५ रोजी सकाळी ८ वाजल्यापासून, प्रभाग क्रमांक २७ मधील चाळीच्या पायवाटांवर ब्लिचिंग पावडर टाकण्यात आली. नागरिकांनी तक्रार केली होती की रस्त्यावर शेवाळं साचल्यामुळे महिला, वृद्ध आणि लहान मुलं घसरून पडत आहेत.
ही तक्रार मिळताच सदैव जनतेच्या सेवेस तत्पर असलेल्या सौ. स्वप्नाली शिंदे यांनी तात्काळ कारवाई करत स्वच्छता व निर्जंतुकीकरणाचं काम सुरु केलं.
श्रावण महिन्यात पूजनासाठी महिलांना मंदिरात अनवाणी जावं लागतं, ही बाब लक्षात घेत आज नागपंचमीच्या शुभदिनी त्यांनी या कामाची अंमलबजावणी केली.
🏆 स्वप्नाली ताईंच्या कामाची विभागातील नागरिकांनी मुक्तकंठाने प्रशंसा केली. त्यांच्या संवेदनशील दृष्टिकोनामुळे नागरिकांमध्ये सुरक्षिततेचा विश्वास निर्माण झाला आहे.
✨ "तक्रार नव्हे, तत्काळ उत्तर" हे स्वप्नाली ताईंचं कार्यपद्धतीचं ब्रीदवाक्य ठरतंय, असं नागरिकांनी गौरवपूर्वक म्हटलं.
सौ. स्वप्नाली शिंदे
भाजपा शक्ती केंद्रप्रमुख, प्रभाग २७




Post a Comment
0 Comments