Type Here to Get Search Results !

अमळनेर तालुक्यातील डोंगर गावाचे नाव आता "उदय नगर" — स्व. उदय वाघ यांच्या कार्याला मिळाले नावात रूप

 

मुख्य संपादक:- सुनिता राजेंद्र महाडिक 



अमळनेर तालुक्यातील डोंगर (ता. अमळनेर) या गावाचे नाव बदलून आता "उदय नगर" असे करण्यात आले असून, हा निर्णय गावासाठी गौरवाचा आणि भावनिक क्षण ठरला आहे.


गावाच्या नावात झालेला बदल हा स्व. उदय वाघ यांच्या सामाजिक, राजकीय आणि विकासात्मक कार्याला दिलेला एक मानाचा मुजरा मानला जात आहे. स्व. उदयदादा हे या परिसरातील लोकप्रिय नेते होते. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या कार्याची प्रेरणा पुढे नेत, त्यांच्या पत्नी सौ. स्मिता वाघ यांनी मागील वर्षी लोकसभेची निवडणूक जिंकून खासदार म्हणून जबाबदारी सांभाळली आहे.


स्मिता वाघ यांच्या पुढाकाराने व शासनाच्या मान्यतेनंतर डोंगर गावाचे नाव आता अधिकृतपणे "उदय नगर" असे ठेवण्यात आले आहे. यामुळे गावात आनंदाचे वातावरण असून गावकऱ्यांनी याचे स्वागत करत स्मिता ताईंप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे.


या नावबदलामुळे केवळ गावाचे ओळखच बदलणार नाही, तर स्व. उदयदादांच्या आठवणी व कार्यही कायम स्मरणात राहतील, असे ग्रामस्थांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments