मुख्य संपादक:- सौ सुनिता राजेंद्र महाडिक
🌸 भाजपात महिलांचा मोठ्या उत्साहात प्रवेश 🌸
काल दिनांक 10 सप्टेंबर 2025 रोजी चाळीसगांव येथील जिंगरवाडी प्रभाग क्रमांक 15 मधून सौ. सुनिता राजेंद्र महाडिक यांच्या अध्यक्षतेने व पुढाकाराने तब्बल 55 ते 60 महिलांनी जल्लोषात भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.
हा पक्षप्रवेश चाळीसगांवचे लाडके आमदार श्री. मंगेश दादा चव्हाण यांच्या कार्यालयात मोठ्या उत्साहात संपन्न झाला. महिलांच्या या मोठ्या संख्येतील प्रवेशामुळे स्थानिक संघटनाला बळकटी मिळाली असून, आगामी काळात भाजपला निश्चितच अधिक बळकटी मिळणार आहे.
✨ या प्रसंगी भाजपा महिला मोर्चा शहराध्यक्ष अँड सौ सुलभा नितीन पवार ताई, भाजपा जळगाव जिल्हा सोशल मीडिया प्रमुख सौ. मोनिका गांगुर्डे ताई व पदाधिकारी मोहिनी कापडणे ताई यांच्या हस्ते पक्ष प्रवेश करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी महिलांचे पक्षात स्वागत करत त्यांना आगामी राजकीय व सामाजिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
🌺 सौ. सुनिता राजेंद्र महाडिक यांचे विशेष कौतुक करावे लागेल. त्यांनी केवळ पुढाकार घेतला नाही, तर महिलांना एकत्र आणून, त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करून, राजकारणात पुढे नेण्याचे कार्य केले आहे. त्यांच्या नेतृत्वामुळेच एवढ्या मोठ्या प्रमाणात महिला भाजपात दाखल झाल्या. समाजसेवेसाठी नेहमी तत्पर असणाऱ्या सुनिता ताईंच्या कार्यामुळे चाळीसगांव परिसरात महिला सक्षमीकरणाचा नवा आदर्श निर्माण होत आहे.
💐 विशेष म्हणजे, पक्षात दाखल झालेल्या या सर्व 55 ते 60 महिला कौतुकास पात्र आहेत. घर सांभाळत समाजकारणात सक्रिय सहभाग घेण्याची त्यांची तयारी खरोखरच प्रेरणादायी आहे. महिलांनी दाखवलेला आत्मविश्वास, त्यांचा उत्साह आणि समाजासाठी योगदान देण्याची तयारी ही एक मोठी जमेची बाजू आहे. या महिला निश्चितच भाजपाच्या विचारधारेचे बळकट खांब ठरतील आणि चाळीसगांवच्या सामाजिक-राजकीय विकासात मोलाचे योगदान देतील.
🌟 आमदार मंगेश दादा चव्हाण हे सदैव कार्यकर्त्यांच्या पाठिशी उभे राहणारे, समाजातील प्रत्येक घटकासाठी झटणारे आणि विशेषतः महिलांच्या प्रगतीसाठी प्रेरणास्थान ठरलेले नेते आहेत. त्यांच्या मार्गदर्शनामुळे महिलांचा आत्मविश्वास दुणावतो आणि त्या समाजकारणात अधिक ताकदीने पुढे येतात.
🌸 महिलांना नेहमी आत्मविश्वास वाढवणाऱ्या शिवनेरी फाऊंडेशनच्या अध्यक्षा माझ्या वहिनी सौ. प्रतिभा मंगेश चव्हाण यांनी सुद्धा त्या ठिकाणी काही कामानिमित्त उपस्थित नसताना सौ. सुनिता राजेंद्र महाडिक यांचे विशेष कौतुक करून नवीन पक्ष प्रवेश झालेल्या सर्व महिलांना शुभेच्छा दिल्या. त्यांच्या शुभेच्छांमुळे महिलांचा उत्साह आणखी वाढला.
👉 सुनिता ताईंच्या पुढाकाराने, महिलांच्या मोठ्या सहभागामुळे, मंगेश दादांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनामुळे व प्रतिभा वहिनींच्या शुभेच्छांमुळे हा पक्षप्रवेश खरोखरच ऐतिहासिक ठरला आहे.
👉 हा पक्षप्रवेश म्हणजे चाळीसगांवच्या राजकीय इतिहासात महिलांच्या नव्या पर्वाची सुरुवात आहे. महिलांच्या सहभागामुळे समाजकारणाला नवा चेहरा मिळत असून, भविष्यात या महिला समाज व राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.









Post a Comment
0 Comments