Type Here to Get Search Results !

जामदा गावाचे सुपुत्र एकनाथ माळतकर सर यांना ‘आदर्श जिल्हा शिक्षक’ पुरस्कार

 








मुख्य संपादक:- सुनिता राजेंद्र महाडिक 
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा:- 9273165283


जामदा ता. चाळीसगाव 
जामदा गावाचे सुपुत्र आणि जिल्हा परिषद प्रशाळा नागद, जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथे कार्यरत असलेले श्री. एकनाथ मोतीलाल माळतकर सर यांची प्रतिष्ठित ‘आदर्श जिल्हा शिक्षक पुरस्कार’ मिळविण्यासाठी निवड झाली आहे. हा मानाचा सन्मान 12 सप्टेंबर रोजी पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रदान केला जाणार आहे.

या पुरस्काराची घोषणा 4 सप्टेंबर रोजी शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येला करण्यात आली. सरांच्या उल्लेखनीय शैक्षणिक कार्याची दखल घेत हा सन्मान जाहीर झाला आहे.

शिक्षक म्हणजे केवळ ज्ञान देणारे नाहीत, तर ते समाजाचे शिल्पकार आहेत. एकनाथ माळतकर सरांनी त्यांच्या कार्यातून हे सिद्ध केले आहे. विद्यार्थ्यांच्या मनात शिक्षणाची ओढ निर्माण करून त्यांना योग्य दिशा देणे, आत्मविश्वास जागवणे, आणि त्यांचे भविष्य घडवणे – हीच खरी गुरूची ओळख आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थी उज्ज्वल भविष्यासाठी तयार झाले आहेत.

दरम्यान, शाहू मराठा मंडळाने काल त्यांच्या निवासस्थानी जाऊन या आदर्श शिक्षकाचा सन्मान केला. या वेळी एकनाथ माळतकर सरांच्या पत्नी आणि जिजाऊ ब्रिगेडच्या तालुकाध्यक्ष सौ. आरस्ता माळतकर ताई देखील उपस्थित होत्या.

शाहू मराठा मंडळ नेहमीच समाजातील मान्यवरांचा सन्मान करून पुढाकार घेत असते आणि समाजासमोर नवा आदर्श ठेवते. अशा उपक्रमातून समाजाला नवी दिशा आणि प्रेरणा मिळते.

या कार्यक्रमाला मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. प्रमुख पाहुण्यांमध्ये

प्रा. रामकृष्ण पांगारे,

लाईव्ह नवं विचार न्यूजच्या मुख्य संपादक सौ. सुनीता राजेंद्र महाडिक यांचे पती
 श्री. राजेंद्र खंडू महाडिक,


श्री. विनायक मंडोळे,

श्री. संजय भाऊ कापसे,

श्री. विलास बापू दुसिंग,

श्री. संजय भाऊ दुसिंग,

श्री. किशोर शिरसाठ,

श्री. सुनिल कावरे,

श्री. ललित बिडे,

श्री. रोहित जाधव,

श्री. मधुभाऊ गुंजाळ,

श्री. जगदीश चव्हाण,

श्री. निलेश जाधव,

श्री. विजय गायकवाड

कु. मुकेश सुनिता राजेंद्र महाडिक यांचा समावेश होता.

गावकऱ्यांमध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये या यशाबद्दल अभिमानाची भावना व्यक्त होत असून, त्यांचा हा सन्मान खऱ्या अर्थाने सर्वांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

Post a Comment

0 Comments