Type Here to Get Search Results !

🌸 गणेशोत्सवात उजेडाची सरस्वती – जनसेविका सौ. स्वप्नाली शिंदे 🌸



मुख्य संपादक:- सौ सुनिता राजेंद्र महाडिक 
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा : - 9273165283



🌸 गणेशोत्सवात उजेडाची सरस्वती – जनसेविका सौ. स्वप्नाली शिंदे 🌸

महालक्ष्मीनगर विभागात गणेशोत्सवाच्या काळात रस्त्यावरील लाईट बंद झाल्यामुळे नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत होते. घराघरात गणरायाचे आगमन झालेले, सार्वजनिक मंडळांमध्ये बाप्पाची प्रतिष्ठापना झालेली आणि त्याचवेळी पावसाचे आगमन झालेले असताना रस्त्यांवर अंधार पसरला होता.

नागरिकांनी तक्रार नोंदवत “ताई, रोडलाईट सुरू करून द्या” अशी मनापासून विनंती केली. या विनंतीला प्रतिसाद देत जनसेविका सौ. स्वप्नाली शिंदे यांनी क्षणाचाही विलंब न करता पुढाकार घेतला. नवीन लाईट्स बसवून विभागातील सर्व बंद पडलेल्या लाईट्स तातडीने सुरू करून दिल्या.

आज महालक्ष्मीनगर परिसर उजेडाने झगमगत आहे. या कार्यामुळे नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंदाची लहर उमटली.
सौ. स्वप्नाली ताई या फक्त जनसेविका नसून नागरिकांच्या प्रत्येक अडचणीला आपल्या घरच्यांसारखी समजून सोडवणारी खऱ्या अर्थाने लोकनेत्री आहेत.

🙏 नागरिकांचा विश्वास, आदर आणि आशीर्वाद यामागे आहे ताईंची तत्परता, संवेदनशीलता आणि जनसेवेची नितांत तळमळ.
“गणेशोत्सवात बाप्पा आला आणि ताईंच्या प्रयत्नांनी उजेडही आला” अशीच आज नागरिकांची भावना आहे.

Post a Comment

0 Comments