मुख्य संपादक:- सौ सुनिता राजेंद्र महाडिक
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा:- 9273165283
आज दिनांक 13 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 10.30 वाजता मा. दिवाणी व फौजदारी न्यायालय, चाळीसगाव येथे राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले. मा. जिल्हाधिकारी जळगाव यांच्या सूचनांनुसार सदर लोकअदालतीमध्ये पुढीलप्रमाणे कार्यवाही करण्यात आली –
1. महसूली वर्ष 2024-25 मधील थकीत तसेच मागील वर्षांतील एकूण 1757 थकबाकीदार खातेदारांना ग्राम महसूल अधिकाऱ्यांमार्फत नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. त्यापैकी 489 थकबाकीदारांनी लोकअदालतीत हजेरी लावून रुपये 7,57,619/- (सात लाख सत्तावन्न हजार सहाशे एकोणीस) इतक्या रकमेचा भरणा केला.
2. एकूण 7 प्रकरणे विविध विभागांच्या थकीत रकमेबाबत ठेवण्यात आली होती. यामध्ये थकबाकीदार व संबंधित विभागीय अधिकाऱ्यांमध्ये तडजोडीबाबत चर्चा होऊन वसुलीची कार्यवाही सुरू आहे.
3. उर्वरित 1268 थकबाकीदारांनी भरणा न केल्यामुळे, त्यांच्या मिळकतींवर रकमेचे बोजे दाखल करून महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 मधील तरतुदीनुसार पुढील कार्यवाही सुरू आहे.
4. या अभियानास मा. उपविभागीय अधिकारी श्री. प्रमोद हिले, तहसीलदार श्री. प्रशांत पाटील, नायब तहसीलदार श्री. एस. बी. निकुंभ व इतर सर्व नायब तहसीलदार, सर्व मंडळ अधिकारी, सर्व ग्राम महसूल अधिकारी, महसूल सेवक तसेच संबंधित विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
👉 विशेष म्हणजे, चाळीसगावचे तहसीलदार श्री. प्रशांत पाटील यांनी संपूर्ण कार्यवाहीला योग्य दिशा देत महसूल वसुलीबाबत प्रभावी समन्वय साधला. तसेच नायब तहसीलदार श्री. एस. बी. निकुंभ व इतर सर्व नायब तहसीलदार यांनीही सक्रिय सहभाग नोंदवून नागरिकांना समजावून सांगत थकबाकी वसुलीस हातभार लावला. त्यांच्या कार्यतत्परतेमुळे या राष्ट्रीय लोकअदालतीला अपेक्षित यश मिळाले.
या राष्ट्रीय लोकअदालतीच्या यशस्वीतेमध्ये चाळीसगावचे तहसीलदार श्री. प्रशांत पाटील यांचे कार्य अत्यंत उल्लेखनीय आहे. त्यांनी महसूल विभागातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना एकत्र बांधून ठेवले, नागरिकांशी संवाद साधून त्यांना कायद्याचे भान करून दिले, तसेच थकबाकीदारांना समजावून सांगून महसूल भरण्याकडे प्रवृत्त केले. त्यांच्या प्रामाणिक नेतृत्वगुणांमुळे आणि सुसंघटित कामकाजामुळे या लोकअदालतीला मोठा प्रतिसाद मिळाला.
त्याचप्रमाणे, नायब तहसीलदार श्री. एस. बी. निकुंभ यांनी विशेष उत्साहाने कामकाज सांभाळले. त्यांच्या सोबत कार्यरत इतर सर्व नायब तहसीलदारांनी सुद्धा नागरिकांशी थेट संवाद साधत, लोकांना विश्वासात घेऊन वसुलीच्या कामात मोठा हातभार लावला. त्यांच्या कष्टाळूपणामुळे, संयमामुळे आणि जनतेप्रती असलेल्या सेवाभावामुळे महसूल विभागाचे कार्य अधिक प्रभावी झाले आहे.
खरं तर तहसीलदार व नायब तहसीलदार हेच महसूल प्रशासनाचे खरे आधारस्तंभ आहेत. त्यांच्या कार्यतत्परतेमुळे व जनसंपर्क कौशल्यामुळे दालतीला यश मिळाले असून चाळीसगाव तहसील प्रशासनाने एक उत्तम आदर्श निर्माण केला आहे.


Post a Comment
0 Comments