Type Here to Get Search Results !

रावसाहेब पाटील यांच्या नेतृत्वामुळे शिवसेना संघटना अधिक मजबूत; पक्षासाठी केलेल्या कार्याची सर्वत्र चर्चा

 

मुख्य संपादक:-  सौ सुनिता राजेंद्र महाडिक 

संपादक:- मुकेश राजेंद्र महाडिक 

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा:- 9273165283



जळगाव जिल्ह्यात शिवसेना संघटना मजबूत करण्यामध्ये शिवसेना जिल्हाप्रमुख तथा माजी जिल्हा परिषद गटनेते रावसाहेब पाटील यांचे मोठे योगदान असल्याची भावना शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. अनेक वर्षांपासून त्यांनी पक्ष संघटनेला बळकटी देण्यासाठी सातत्याने काम करत ग्रामीण भागापासून शहरांपर्यंत शिवसेनेचे जाळे अधिक सक्षम केले आहे.


रावसाहेब पाटील यांनी विविध जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडताना पक्षनिष्ठा, जनसंपर्क आणि संघटन कौशल्याचा प्रभावी परिचय दिला आहे. जळगाव जिल्हा परिषदेतील शिवसेना गटनेते, नगरदेवळा–बाळद गटाचे जिल्हा परिषद सदस्य, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती पाचोरा–भडगावचे माजी सभापती म्हणून त्यांनी विकासकामांना प्राधान्य दिले.


जिल्हाप्रमुख म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी प्रत्येक तालुक्यातील पदाधिकारी, शाखाप्रमुख आणि शिवसैनिकांना एकत्र आणण्याचे काम केले. पक्षाची संघटनात्मक ताकद वाढविणे, नव्या कार्यकर्त्यांना संधी देणे, युवकांना पक्षाशी जोडणे आणि जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने पाठपुरावा करणे, यामुळे त्यांच्यावरील विश्वास अधिक दृढ झाला आहे.


नैसर्गिक आपत्ती, अतिवृष्टी किंवा इतर संकटांच्या काळातही रावसाहेब पाटील यांनी घटनास्थळी जाऊन परिस्थितीची पाहणी केली असून नागरिकांना धीर देत प्रशासनाकडे तातडीच्या मदतीची मागणी केली आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांवर त्यांनी सातत्याने आवाज उठविल्याने त्यांची जननेते म्हणूनही ओळख निर्माण झाली आहे.


शिवसेना पक्षप्रमुखांच्या विचारांशी निष्ठा ठेवत त्यांनी पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी अथक परिश्रम घेतले आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील अनेक कार्यकर्त्यांना पक्षात काम करण्याची प्रेरणा मिळाली असून शिवसेनेचा जनाधार वाढविण्यात त्यांचे योगदान महत्त्वाचे मानले जाते.


रावसाहेब पाटील यांच्या कार्यपद्धतीमुळे जळगाव जिल्ह्यातील शिवसेना अधिक संघटित आणि सक्रिय झाल्याचे मत अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते व्यक्त करतात. विकासाभिमुख भूमिका, सर्वसामान्यांशी असलेला सातत्यपूर्ण संपर्क आणि पक्षासाठी केलेले समर्पित कार्य यामुळे ते जळगाव जिल्ह्यातील शिवसेनेचे प्रभावी नेतृत्व म्हणून ओळखले जात आहेत.


पाचोरा व भडगाव चे कार्यसम्राट लोकप्रिय आमदार किशोर आप्पा पाटील यांनी रावसाहेब पाटील यांना 'जिभू 2029 भडगाव विधानसभे साठी' तयारीला लागा असे देखील पक्षाच्या काही मेळाव्यांमध्ये सांगितले आहे

Post a Comment

0 Comments