Type Here to Get Search Results !

धरणगावात घरफोडी; घरातून ५४ हजारांची रोकड लंपास

 

मुख्य संपादक:- सौ सुनिता राजेंद्र महाडिक 

संपादक:- मुकेश राजेंद्र महाडिक 

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा:-9273165283



धरणगाव : शहरातील मातोश्री नगर परिसरात अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करून तब्बल ५४ हजार रुपयांची रोकड चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.


मिळालेल्या माहितीनुसार, मातोश्री नगर, धरणगाव येथील रहिवासी गणेश विठ्ठल बच्छाव (वय ३८, व्यवसाय नोकरी) यांच्या राहत्या घरी ही चोरी झाली. दिनांक १४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री ८ वाजेपासून ते १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ८ वाजेपर्यंतच्या कालावधीत अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश केला. घरातील रोख रकमेवर डल्ला मारत चोरट्याने ५०० रुपयांच्या नोटांच्या स्वरूपातील ५० हजार रुपये चोरून नेले. तसेच, त्यांच्या मुलीच्या गल्ल्यात जमा केलेली १००, ५०, २० आणि १० रुपयांच्या नोटांची एकूण ४ हजार रुपयांची रक्कमही चोरट्याने लंपास केली. अशा प्रकारे एकूण ५४ हजार रुपयांची रोकड चोरीस गेली.


या घटनेनंतर गणेश बच्छाव यांनी धरणगाव पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०५ (अ) आणि ३३१ (४) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.


घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक उमाकांत गायकवाड यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस नाईक ज्ञानेश्वर कोळी (ब.नं. ३१३४) करत आहेत. चोरीच्या या घटनेमुळे परिसरात चर्चेला उधाण आले असून, अज्ञात चोरट्याचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.

Post a Comment

0 Comments